शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
"महात्मा गांधींना जगभरात कोणीही ओळखत नव्हतं"; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
3
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
4
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
5
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
6
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
7
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
8
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
9
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
10
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
11
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
12
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
13
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
15
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
16
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
17
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
18
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
19
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
20
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकूया;वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 07, 2021 12:44 PM

देवदूताची वाट सगळेच पाहतात, आपण कोणासाठी देवदूत बनूया!

मदत करायला पैसेच कामी येतात असे नाही. तर मदतीची भावना मनात असावी लागते. आपण सगळेच जण देवदूताची वाट पाहत असतो, परंतु भगवंताने जर आपल्याला सक्षम बनवले असेल, तर आपण कोणाच्या आयुष्यात देवदूत बनून जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. कारण, पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकले पाहिजे! तो कसा कमवायचा, शिकूया या गोष्टीतून...!

एक तरुण आपल्या पहिल्या नोकरीची पार्टी देण्यासाठी मित्रांसमवेत एका हॉटेलात गेला. त्याने सर्वांसाठी गारेगार लस्सीची ऑर्डर दिली. तेव्हाच एक भिकारी बाई बाहेरून त्या तरुणाकडे बघत खुणेने भीक मागत होती. कधी नव्हे ते, हा तरुण भीक द्यायला उठला. मित्रांना आश्चर्य वाटले. त्या बाईजवळ जात तरुणाने पैशांचे पाकीट काढले आणि त्यातून पैसे न देता त्या बाईला विचारले, 'आजी, लस्सी पिणार?'

आपल्याला एवढ्या आदराने, प्रेमाने कोणी आजी म्हटले, हे ऐकून त्या बाईला मोहरून आले. तिने नकारार्थी मान डोलवली. तरुणाने पुन्हा आग्रह केला आणि वेटरला ऑर्डर दिली. मित्रांबरोबर आजीसाठीसुद्धा लस्सीचा ग्लास आला. आजी तो ग्लास घेऊन हॉटेलच्या पायरीबाहेर बसली. आजीला आत बोलावून आपल्या बरोबर बसवावे असे तरुणाला वाटले. परंतु, हॉटेल मालकाला ते रुचले नसते. म्हणून तो आपल्या लस्सीचा ग्लास घेऊन आजीजवळ जाऊन बसला. मित्रांसाठी त्याचे वागणे अनाकलनीय होते.

हॉटेल मालकाने त्या दोघांना पाहिले आणि दोन खुच्र्या पाठवल्या व त्यावर बसायला सांगितले. तो तरुण हॉटेल मालकाचे आभार मानणार, तोच हॉटेल मालक म्हणाला, 'आभार मानू नका, माझ्या हॉटेलमध्ये ग्राहक अनेक येतात, पण माणसं कमी येतात. तुम्ही माणुसकी जपलीत, मी माणुसकीचा आदर केला. यापुढे मीसुद्धा मला शक्य होईल तेव्हा माणुसकी जपण्याचा नक्की प्रयत्न करेन. कारण मेहनत करून पैसे कमवता येतीलही, परंतु आशीर्वाद कमवायला आधी माणुसकी कमवायला हवी!'