शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील भेद उलगडून सांगणार डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, live चर्चासत्रात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 08:00 IST

अध्यात्माची एवढी चांगली पार्श्वभूमी असलेल्या डॉ. राजीमवाले यांच्याकडून सदर विषयाचा विस्तृत परिचय करून घेण्याची संधी दवडू नका. तुम्हीदेखील सहभागी व्हा, ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!

साधू आणि संधीसाधू यातला फरक आपल्याला  ज्यादिवशी कळेल, त्यादिवसापासून आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करणार नाही. परंतु यातला फरक आपल्याला समजवून सांगणार तरी कोण? तरुणांना तर या विषयातील मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. हे महत्त्व लक्षात घेता 'भक्ती डोळस की केवळ श्रद्धेवर' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले. ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर अभिनेत्री गायत्री दातार यांच्याशी ते live संवाद साधणार आहेत. 

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. 

अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.

अध्यात्माची एवढी चांगली पार्श्वभूमी असलेल्या डॉ. राजीमवाले यांच्याकडून सदर विषयाचा विस्तृत परिचय करून घेण्याची संधी दवडू नका. तुम्हीदेखील सहभागी व्हा, ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!