शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा किलो कणिक दान करून, शेठजींनी केली आठ पिढ्यांची सोय; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 08:00 IST

भविष्याची काळजी सोडा, आजचा क्षण भरभरून जगा.

अर्धा किलो कणिक दान करून, शेठजींनी केली आठ पिढ्यांची सोय; वाचा ही गोष्ट!एक शेठजी, जे पिढीजात गर्भश्रीमंत होते. हाताखाली नोकर चाकर काम करत होते. शेठजींना कसली काळजी नव्हती. सगळे काही सुरळीत सुरू होते. एक दिवस शेठजींनी आपल्या लेखापालाला बोलावून घेतले आणि आपल्या संपत्तीची मोजदाद करायला सांगितली. सगळे व्यवहार कागदोपत्री लिहून लेखापालाने शेठजींना हिशोब देत म्हटले, `शेठजी तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे, की तुमच्या पुढच्या सात पिढ्या घरी बसून आरामात खातील. तुम्ही निश्चिंत राहा.' एवढे बोलून लेखापाल गेला. शेठजींना काळजी लागली, आठव्या पिढीची!

शेठजी विचार करू लागले, सात पिढ्या मला दुवा देतील, पण आठवी पिढी माझ्या नावाने शंख करेल त्याचे काय? काहीतरी उपाय केला पाहिजे. शेठजी दिवसरात्र अस्वस्थ राहू लागले. एक दिवस ते जवळच्या एका मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांना फार शांत वाटले. परंतु, कीर्तन संपताच मनातल्या काळजीने डोके वर काढले. शेठजींनी महाराजांना प्रश्न विचारला आणि समस्येचे समाधान विचारले. महाराज म्हणाले, `सोपा उपाय सांगतो. आपल्या गावात एक भाग गरीब वस्तीने व्यापलेला आहे. तिथल्या झोपड्यांमध्ये सर्वात शेवटची झोपडी आहे, तिथे एक आजी राहते. तिला तू अर्धा किलो कणीक दान कर. तुझे सगळे प्रश्न सुटतील.'

शेठजी आनंदात निघाले. अर्धा किलो काय, तर एक क्विंटल कणिक त्यांनी नोकराकडून मागवून घेतली आणि ते दोघे आजीच्या घरी पोहोचले. शेठजींनी आजीला म्हणाले, `आजी मी तुम्हाला एक क्विंटल कणीक दान करायला आलो आहे. तुमच्या महिनाभराचा पोळ्यांचा प्रश्न सुटेल. याचा स्वीकार करा.'

आजी नको म्हणाल्या. शेठजी म्हणाले, `माझे मन मोडू नका. एक नाही तर अर्धा क्विंटल कणीक घ्या.' त्यावरही आजीने नकारार्थी मान फिरवली. शेठजींनी पुन्हा आग्रहक केला, `किमान एक किलो नाहीतर अर्धा किलो तरी कणीच घ्याच!' आजींनी हात जोडून सांगितले, `शेठजी माझे आजचे जेवण झाले आहे. माझ्या आजच्या जेवणाची सोय भगवंताने लावून दिली आहे. उद्याची काळजी करायला तो समर्थ आहे. मला या मोहात अडकायचे नाही. तो काय करायचे ते बघून घेईल. तुम्ही हे दान दुसऱ्या कोणा गरजवंताला द्या!'

शेठजींना कळले, की महाराजांनी या स्वाभीमानी आजीकडेच मला का पाठवले, तर माझ्या डोळ्यात अंजन पडावे म्हणून! शेठजींनी आजीला नमस्कार केला. त्यांची सगळी चिंताच मिटली. ते यथाशक्ती दान धर्म करू लागले आणि त्यातून त्यांच्या आठ पिढ्याच काय, तर सगळ्या पिढ्यांना भरभरून आशीर्वाद मिळाला!'

म्हणून भविष्याची काळजी सोडा, आजचा क्षण भरभरून जगा. आपली काळजी घ्यायला भगवंत आहे.