शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचे डोही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 04:24 IST

तैत्तिरीय उपनिषदात आनंदाच्या वर्णनात ब्रह्मानंदाचे मोजमाप सांगितले आहे. समजा, उत्तम आरोग्य, उत्तम अध्ययन, उत्तम सामर्थ्य आहे अशा सुंदर तरु णाला पृथ्वीचे राज्य मिळाले, तो पृथ्वीपती झाला, तर जो आनंद होईल, त्याला मानुषी आनंद म्हणतात.

- शैलजा शेवडे‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे...’ हा तुकाराम महाराजांचा अभंग वाचताना मनात खरोखर आनंद निर्माण होतो. त्यांना ही अनुभूती आली, त्यांचे मन, शरीर आनंदाचा डोह तयार झाला. त्यातून आनंदाचेच तरंग निर्माण झाले. हा आनंद परमानंद असतो. ब्रह्मानंद असतो. हा विलक्षण आनंद ब्रह्मीभूत झालेल्या व्यक्तींनाच मिळू शकतो.तैत्तिरीय उपनिषदात आनंदाच्या वर्णनात ब्रह्मानंदाचे मोजमाप सांगितले आहे. समजा, उत्तम आरोग्य, उत्तम अध्ययन, उत्तम सामर्थ्य आहे अशा सुंदर तरु णाला पृथ्वीचे राज्य मिळाले, तो पृथ्वीपती झाला, तर जो आनंद होईल, त्याला मानुषी आनंद म्हणतात. असे शंभर मानुषी आनंद एक केले, तर मनुष्य गंधर्वाचा आनंद. कामावर विजय मिळवलेल्या विद्वान व्यक्तीला हा आनंद मिळतो. मनुष्य गंधर्वाचे शंभर आनंद एक केले, तर श्रेष्ठ गंधर्वाचा आनंद. देव गंधर्वाचा एक आनंद ! श्रेष्ठ गंधर्वाचे शंभर आनंद म्हणजे पुत्रजन्माचा आनंद, पुत्रजन्माचे शंभर आनंद म्हणजे कनिष्ठ देवतांचा एक आनंद, कनिष्ठ देवतांचे शंभर आनंद म्हणजे देवांचा एक आनंद. देवांचे शंभर आनंद म्हणजे इंद्राचा एक आनंद, इंद्राचा एक आनंद म्हणजे गुरु चा एक आनंद. गुरु चे शंभर आनंद म्हणजे प्रजापतीचा एक आनंद. प्रजापतीचा एक आनंद म्हणजे ब्रह्मानंद. ईश्वर दर्शनाचा आनंद.निष्काम कर्म करत वर जाता जाता कर्मयोग्याला हा आनंद मिळत जातो. शेवटी ईश्वर दर्शन होते. अद्वैत जाणवते. तो संपूर्ण आनंदमय बनतो. हा साक्षात्कार होतो, तेव्हा कसलेही भय उरत नाही. केवळ आनंदच आनंद ! जे आपल्यात आणि सर्व प्राण्यांमध्ये चैतन्य आहे, तेच सूर्यामध्येही आहे. जीव आणि सूर्यासारखे प्रचंड तारे यात एकच परमतत्त्व वास करत आहे.हे जो जाणतो, तो अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश ओलांडून आनंदमय कोशापर्यंत जातो, पलीकडे जातो, ब्रह्मात मिसळतो. आत्मज्ञानी परमतत्त्व अनुभवू शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक