शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:09 IST

प्रेमानंद महाराजांच्या मते, वाईट नशीब किंवा संकटे दूर करण्यासाठी केवळ ईश्वराचे नामस्मरण आणि अनुष्ठान हाच खरा मार्ग आहे.

मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. अलीकडेच एका भक्ताने महाराजांना, 'आजकाल प्रत्येक जण आपले नाव बदलत आहे अथवा नावापुढे नंबर अथवा स्पेलिंग जोडत आहे, असे केल्याने, खरोखरच नशीब बदलू शकते का?' असा प्रश्न विचारला. यावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

नाव बदलल्याने किंवा स्पेलिंगमध्ये बदल केल्याने काहीही साध्य होत नाही -प्रेमानंद महाराज म्हणाले, "जर असे प्रत्यक्षात झाले अशते, तर आपण स्वतःच करून बघा आणि मलाही सांगा. म्हणजे मलाही लोकांना सांगता येईल. नाव बदलल्याने किंवा स्पेलिंगमध्ये बदल केल्याने काहीही साध्य होत नाही. जर असे शक्य असते, तर सर्वांनीच ते केले असते. अशा प्रकारचे उपाय सांगणारे लोक केवळ सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्याचे काम करतात. केवळ अंगठ्या घालणे, जंतर किंवा गंडे बांधणे यांसारख्या बाह्य गोष्टींनी प्रारब्ध बदलत नाही, असे ते म्हणाले.

प्रेमानंद महाराजांच्या मते, वाईट नशीब किंवा संकटे दूर करण्यासाठी केवळ ईश्वराचे नामस्मरण आणि अनुष्ठान हाच खरा मार्ग आहे. ते म्हणाले, "कधीकधी लोकांचे काम चुकून झाले तर त्यांना वाटते की ते स्पेलिंग बदलल्यामुळे झाले; पण प्रत्यक्षात ते त्यांच्या पूर्वीच्या पुण्याचे फळ असते, जे अचानक प्रकाशित होते."

दरम्यान, निरंतर नामजप आणि मंत्रांचे अनुष्ठान करा, सर्वांशी प्रामाणिकपणे वागा आणि कोणतेही पाप कृत्यापासून दूर रहा, स्वप्नपूर्तीसाठी कष्ट आणि साधनेची जोड द्या, गंगा-यमुना स्नान, तीर्थयात्रा आणि धर्माच्या मार्गाने चालणे यामुळेच जीवनात मंगल होईल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Name Change or Ring Doesn't Change Fate: Premanand Maharaj's View

Web Summary : Premanand Maharaj dismisses name changes or rings as fate-altering solutions. He emphasizes devotion, honest living, and avoiding sinful acts as the true path to well-being. Past good deeds, not superficial changes, influence outcomes.
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक