शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:03 IST

Mandir Darshan Rules: देवळात जाऊन देवाचे दर्शन घेताना काही नियम पाळावेत, असे सांगितले जाते.

Mandir Darshan Rules: भारतात संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट का करावी आणि का करू नये, याचे काही नियमही पाहायला मिळतात. या नियमांचा विचार केवळ धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्‍या केलेला नाही, तर तो शास्त्रीय दृष्ट्‍याही केलेला आढळून येतो. भारतात तीर्थस्थळे, मंदिरे यांची कमतरता नाही. प्रत्येक गावात एकतरी मंदिर आढळून येते. देशातील कोट्यवधी भाविक दररोज देवदर्शन घेतात. परंतु, देवळात जाऊन देवाचे दर्शन घेताना काही नियम पाळावेत, असे सांगितले जाते. 

भारतात हजारो तीर्थस्थळांवर कोट्यवधी भाविकांची ये-जा असते. दररोज लाखो भाविक विविध ठिकाणच्या तीर्थस्थळांना भेटी देत असतात. कुलदेवी, कुलदेवता, आराध्य देवता यांचे आवर्जून दर्शन घेतले जाते. त्या स्थानाचे महात्म्य, महत्त्व यांचा विलक्षण अनुभव भाविक घेत असतात. अनेक भाविक अनेक प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध होत असतात. 

१० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!

- देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास पाय अवश्य धुवावेत.

- देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.

- देवळाच्या पायर्‍या चढतांना पायरीला नमस्कार करावा.

- देवतेला जागृत करत आहोत, या भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी.

- देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यांत साठवावे.

- देवतेला अर्पण करायच्या वस्तू चरणांवर अर्पण कराव्यात. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी. 

- देवतेच्या चरणी लीन होत आहोत, या भावाने नमस्कार करावा. देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता, बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे.

- दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. देवांना सम आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात.

- प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा. देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा. 

- देवळातून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा देवतेला नमस्कार करून, तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे, अशी प्रार्थना करावी.

- देवळातून बाहेर पडत असतांना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Proper temple visit: Follow these 10 important rules!

Web Summary : Visiting temples requires adherence to certain rules. Always wash feet before entering, circumambulate thoughtfully, and receive prasad respectfully. Maintain humility and seek blessings before departing, ensuring you never turn your back to the deity.
टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक