शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

जीवनात चांगले कर्म करा, फळ चांगलेच मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 17:53 IST

पाप केल्यावर भोग हे भोगावेच लागतात. यासाठी सर्वांनी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगलेच मिळेल. पाप करु नका. चूक करु नका. आई, वडील गुरूंची सेवा करा. पाप केल्यावर स्वत:ला भोग प्राप्त होतातच. 

अध्यात्म

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥४-७॥

अध्याय क्रमांक-४ मध्ये श्लोक ७ वा आहे. या श्लोकाव्दारे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पृथ्वीवर अधर्म होतो. त्यावेळी भगवान (देव) अवतार घेतात. हे अर्जुना, जेंव्हा धर्माला क्षीणता येते व अधर्माचा जिकडे तिकडे प्र्नादुर्भाव होतो, तेंव्हा तेंव्हा मी स्वत:ला उत्पन्न करतो. मी मायेने शरीर धारण करतो. 

याचे दोन प्रकार पडतात. १) माया-प्रकृती २)ब्रम्हा-ज्या गोष्टीला आकार नाही. मायापासून दूर असते याला ब्रम्हा म्हणतात. 

जेंव्हा जेंव्हा धर्मावर संकटे येते, त्यावेळी स्वत: देव पृथ्वीवर अवतार घेतात.  उदा-प्रल्हाद व हिरण्यकश्यपू.

हिरण्यकश्यपू याने पृथ्वीवर हाहाकार करुन खूप अन्याय, पाप केले. तो देवाला मानत नसे. स्वत:लाच देव समजत असे. पण काही दिवसांनी हिरण्यकश्यपू व कयाहू याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येतो. त्याचा सांभाळ करण्यासाठी भगवान अवतार घेतात. नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा नाश करतात. 

हिरण्यकश्यपूने तप करुन भगवान शंकराकडून वर प्राप्त केला होता. मला मरण घरात नको, दारात नको. जमिनीवर नको. सूर्य उगवल्यावर नको. सूर्य मावळल्यावर नको. शस्त्राने नको. यावेळी भगवान शंकरांनी तथास्थू म्हटले. यानंतर विष्णूला अवतार घ्यावा लागला. नरसिंह रुपाने  हिरण्यकश्यपूला उंबºयावर धरला. त्याचे नखाने पोट फाडले. अशा रितीने दुष्टाचा नाश करुन भक्तांचा सांभाळ केला. 

साधूंचे रक्षण करण्यासाठी दुष्टाचा समूळ नाश करण्यासाठी व धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार करतो.

अहंकार-मानवी जीवनामध्ये अहंकार येऊ देऊ नये. देवाला अहंकार जमत नाही. सर्व देवच करतो, असे समजावे. 

एक राजा होता. एक प्रधान होता. तेव्हा राजा म्हणतो हे सर्व कोण करतो. तेव्हा प्रधान म्हणतो, देव करतो. राजा म्हटला, प्रधान मला ते कसे सांगा? तेव्हा प्रधान म्हणतो, राजा हे सांगण्यासाठी तुला सिंहासन सोडून खाली बसावे लागेल. तुझे वस्त्रे मला घालण्यासाठी द्यावे लागतील. तेव्हा राजा होय म्हणाला. त्याने प्रधानाला वस्त्रे दिली. यानंतर प्रधान सिंहासनावर बसला. राजाला म्हणाला, आता मी राजा आहे. तुम्ही प्रधान. त्यावेळी प्रधान झालेला राजा म्हणाला, देव हेच करतो. वरच्याला खाली आणि खालच्याला वर घेतो. 

याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की, पाप केल्यावर भोग हे भोगावेच लागतात. यासाठी सर्वांनी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगलेच मिळेल. पाप करु नका. चूक करु नका. आई, वडील गुरूंची सेवा करा. पाप केल्यावर स्वत:ला भोग प्राप्त होतातच. 

याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की, पाप करु नका. कोणावर अन्याय करु नका. चूका करु नका. चुकीचे कर्म केले तर त्याचे भोग स्वत:लाच भोगावे लागतात. अर्धमाने वागल्यानंतर देव स्वत: शिक्षा करतो. भक्तांचे रक्षण करतो.

-गोरख महाराज शिंदे,  तळवडी दत्त मंदिर प्रमुख.९८५०९५६८२७.