शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:46 IST

Shri Swami Samarth Manas Puja: दिवाळीत स्वामी समर्थ महाराजांची सेवा शक्य झाली नाही तर मानसपूजा आवर्जून करावी, असे सांगितले जात आहे. मानस पूजा म्हणजे काय? जाणून घ्या...

Shri Swami Samarth Manas Puja: श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला, तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा, नामस्मरण केले जाते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्रांचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते. अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. दिवाळीचा सण सुरू आहे. दिवाळीत गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची सेवा शक्य झाली नाही, तरी श्री स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा अवश्य करावी, असे सांगितले जात आहे.

स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत.  स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत. या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात. स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्यक्ष मठात जाणे, स्वामींचे नित्यनियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नये. स्वामी समर्थ मानस पूजा करावी, असे म्हटले जाते.

मानस पूजा म्हणजे काय?

मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानस पूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्ट देवताचे स्वरुप आपल्या मन:पटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, म्हणजे मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी, असे सांगितले जाते. मानसपूजा म्हणजे काय? तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा. शिव मानस पूजा किंवा देवी मानस पूजा प्रचलित आणि प्रसिद्ध आहे. 

श्री स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा कशी करावी?

कोट्यवधी घरांमध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची देवपूजा केली जाते. आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्युलमुळे अनेकदा घाईघाईत पूजा उरकली जाते. अनेकदा नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते. अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात. वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजा करणे जमत नाही. अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा. जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते. सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा. परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणभाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते. प्रथम ध्यान श्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे.

श्री स्वामी समर्थ मानस पूजा

नमो स्वामीराजम दत्तावताराम ।श्री विष्णू ब्रम्हा शिवशक्तिरूपम ।।ब्रह्मस्वरूपाय करूणाकाराय ।नमो नमस्ते ।।

हे स्वामी दत्तात्रय हे कृपाळा ।मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ।।कुठे माय माझी म्हणे बाळ कैसा ।समर्थ तुम्हाविना हो जीव तैसा ।।

स्वामी समर्थ तुम्ही स्मर्तगामी ।हृदयसानी या बस प्रार्थितो मी ।।पूजेचे यथासांग साहित्य केले ।मखरात स्वामी गुरु बैसले ।।

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती ।जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती ।।असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ ।परब्रम्ह साक्षात गुरुदेव दत्त ।।

सुवर्ण ताटी महारातन ज्योती ।ओवाळुनि अक्षता लावू मोती ।।शुभारंभ एस करुनि पूजेला ।चरणावरी ठेवू या मस्तकाला ।।

हा अर्घ्य अभिषेक स्वीकारी माझा ।तुझी पद्य पुजा करी बाळ तुझा ।।प्रणिपात साष्टांग शरणागताचा ।तुम्हा वाहिला भर या जीवनाचा ।।

हि ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा ।शिव शंकराची असे शक्तिपूजा ।।दही दूध शुद्धहोदकाने तयाला ।पंचामृती स्नान घालू प्रभूला ।।

वीणा तुताऱ्या किती वाजताती ।शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।।म्हणती नगारे गुरुदेव दत्तश्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ ।।

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली ।श्री दत्त स्वामी सी या स्नान घाली ।।महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया ।महिमा तयांचा काळात जगा या ।।

मी धन्य झालो हे तिथे घेता ।घडू दे पूजा हि यथासांग आता ।।अजानुबाहू भव्य कांती सतेज ।नसे मानवी देह हा स्वामी राज ।।

प्रत्यक्ष श्रीसद्गुरू दत्तराज ।तथा घालूया रेशिमी वस्त्रसाज ।।सुगंधित भाळी तिला रेखियला ।शिरी हा जरी टोप शोभे तयाला ।।

वक्ष स्थळी लाविल्या चंदनाचा ।सुवास तो वाढावी भाव साचा ।।शिरी वाहूया बिल्व तुलसी दलाते ।गुलाब जय जुई अत्तराते ।।

गंधाक्षता वाहुनी या पदाला ।हि अर्पूया जीवन पुष्पमाला ।।चरणी करांनी मिठी मारू देई ।म्हणे लेकरांसी सांभाळ आई ।।

इथे लावया केशर कस्तुरीचा ।सुगंधी हा खूप नाना प्रतीचा ।।पुष्पांजली हि तुम्हा अर्पियेली ।गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली ।।

करुणावतारी अवधूत कीर्ती ।दयेची कृपेची जशा शुद्ध मूर्ती ।।प्रभा काकली शक्तीच्या मंडलाची ।अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची ।

हृदयमंदिरांची हि स्नेह्ज्योती ।मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ।।करू आरती आर्तभावे प्रभूची ।गुरुदेव स्वामी स्वामी दत्तात्रयाची ।।

पंचारती हि असे पंचप्राण ।ओवाळुनि ठेवू चरणांवरून ।।निघेना शब्द बोलू मी तोही ।मनीचे तुम्ही जनता सर्व काही ।।

हे स्वामीराजा बस भोजनाला ।हा पंच पक्वान्न नैवेद्य केला ।।पुरांची पोळी तुम्हा आवडीची ।लाडू कारंजी असे हि खव्याची ।।

डाळिंब, द्राक्षे, फळे आणि मेवा ।हे केशरी दूध घ्या स्वामी देवा ।।पुढे हात केला या लेकराने ।प्रसाद द्यावा आपुल्या कराने ।।

तांबूल घ्यावा स्वामी समर्था ।चरणांची सेवा करू द्यावी आता ।।प्रसन्नतेतून मागू मी काय ।हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय ।।

सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू ।दुजी दक्षिण मी तुम्हा काय देऊ ।।नको दूर लोटू आपुल्या मुलासी ।कृप छत्र तुमचेच या बालकासी ।।

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला ।पदी ठेवू शीर शरणांगतला ।।हृदयी भाव यावे असे तळमळीचे ।करो पूर्ण कल्याण जे या जीवाचे ।।

तुझे बाळ पाही तुझी वाट देवा ।नका वेळ लावू कृपा हसत ठेवा ।।मणी पूजनाची अशी दिव्य ठेव ।

वसो माझिया अंतरी स्वामी देव ।।वसो माझ्या अंतरी स्वामी देव ।वसो माझ्या अंतरी स्वामी देव ।।

|| श्री दत्तार्पणमस्तु ||

|| श्रीगुरूदेव दत्त ||

|| श्री स्वामी समर्थ ||

----००००---- 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थDiwaliदिवाळी 2024spiritualअध्यात्मिक