शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2024: दिवाळीत रोषणाईची कसूर करू नका; फक्त दिवे लावताना 'ही' चूक टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:33 IST

Diwali 2024: दिवाळीत आनंदाला भरते येते, मात्र उत्साहाच्या नादात छोट्या पण महत्त्वाच्या चुका नकळत घडतात; तो टाळण्यासाठी हा छोटासा प्रयत्न

दिवाळी हा रोषणाईचा सण! आपण असंख्य दिवे लावतो.  तसेच पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे असे नानाविध प्रकारांचा समावेश करतो. रोषणाई आकर्षक व्हावी, यासाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. इतर दिवे उत्सवाच्या वेळी वापरले जातात, तर रोजच्या पूजेत समई आणि निरांजनाची वर्णी लागते. त्यातही समई तेलाची आणि निरांजन तुपाने लावण्याचा प्रघात आहे.

समईची वात लांब असते तर निरांजनाची वात बसकी गोलाकार असते. निरांजनात एक वात, तर समईत दोनापेक्षा अधिक वाती लावल्या जातात. हे गुणोत्तर उलट करू नये. देवापुढे लावायच्या दिव्यात तेल किंवा तूप याव्यतिरिक्त अन्य कोणतेही ज्वलनद्रव वापरू नये, असे अग्नीपुराणातील आदिकल्प पुराणात सांगितले आहे. या गोष्टी रोजच्या निरीक्षणातल्या असूनही आपली आई, आजी आपल्याला दिवा लावताना नेहमी हटकते, `एकाच काडीने किंवा तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नको.' आपण त्यांचे म्हणणे ऐकतो, पण त्यामागचे शास्त्र समजून घेत नाही. चला जाणून घेऊ, तसे न करण्यामागचे कारण!

माणसांना ओवाळताना तेलाच्या दिव्याने ओवाळले जाते. त्याला आपण औक्षण म्हणतो. पुण्याहवाचन किंवा इतर वेळी औक्षण करताना तेलाचा दिवा वापरतात. पूर्वी पती युद्धावर जाताना त्याची पत्नी तेलाच्या दिव्याने ओवाळत असे. आजही वाढदिवसाच्या दिवशी मुलांना, मोठ्यांना ओवाळताना तेलाचा दिवा वापरला जातो. तुपाच्या दिव्याच्या तुलनेत तेलाचा दिवा बरात वेळ तेवत असतो. दिव्याच्या ज्योतीचा संबंध मनुष्याच्या आत्मज्योतीशी असल्यामुळे औक्षण करणारी व्यक्ती समोरील व्यक्तीच्या दीर्घायुष्याचे शुभचिंतन करत असते. बहीण भावाला ओवळताना, बायको नवऱ्याला ओवाळताना, आई मुलांना ओवाळताना हाच विचार मनात तेवत असतो. म्हणून औक्षणाच्या वेळेस तेलाचा दिवा वापरला जातो.

देवाला ओवाळताना, त्याची आरती करताना तुपाचा दिवा लावला जातो. देवकार्यात समस्त पवित्र गोष्टींचा वापर केला जातो. तूप हे पवित्र मानले जाते. तुप हे समृद्धीचे प्रतीक आहे. तुपाच्या निरांजनाने देवाला ओवाळून त्याबदल्यात आपले आयुष्य त्याच्या आशीर्वादाने उजळू देत अशी प्रार्थना केली जाते.

 आता प्रश्न येतो, तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा का लावू नये याचा, तर उत्तर हे आहे, की हे दोन्ही घटक भिन्न आहेत. एक खनिज तर दुसरा प्राणिज. त्या दोघांचे एकत्रीकरण होऊ नये, हा त्यामागील हेतू असतो. म्हणून अनेक ठिकाणी दोन्ही प्रकारचे दिवे एकत्र लावणे टाळतात. जर दोन्ही प्रकारचे दिवे एकाच वेळेस लावले, तरी हरकत नाही, फक्त ते वेगवेगळ्या काडीने लावले पाहिजेत, ही बाब लक्षात ठेवावी. 

चला तर, दिवाळीची तयारी पूर्णत्वाला नेऊया आणि शास्त्राचे पालन करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४