शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2021: येथे गणेश चतुर्थीला नाही तर दिवाळीला होते बाप्पांची प्रतिष्ठापना, कोकणातील उभादांडा गावातील आगळी-वेगळी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 11:06 IST

Ubhadanda Gandesh Mandir: राज्यासह देशभरात सध्या Diwali उत्साहात साजरी केली जात आहे. दिवाळीला लक्ष्मीची पूजा सर्वत्र केली जाते. मात्र कोकणातील उभादांडा येथील गणपती मंदिरात दिवाळीला लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते.

वेंगुर्ला - राज्यासह देशभरात सध्या दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. दिवाळीला लक्ष्मीची पूजा सर्वत्र केली जाते. मात्र कोकणात असं एक गाव आहे जिथे असलेल्या गणपती मंदिरात दिवाळीला लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. कोकणामधील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या गावात हे  अनोखे गणेश मंदिर आहे. काल लक्ष्मीपूजना दिवळी येथील मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.

गणपती म्हणजे मराठी माणसाचे आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्रात गणपतीची अनेक जागृत मंदिरे आढळतात. बहुतांश गणेश मंदिरांमध्ये गणपतीची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापित केलेली असते. तर काही मंदिरांमध्ये गणेशोत्सवात किंवा गणेश जयंती दिवशी गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. मात्र उभादांडा येथील गणेश मंदिर मात्र या सर्वाला अपवाद आहे. उभादांडा हे गाव वेंगुर्ला शहराला लागून आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात वेंगुर्ला-शिरोडा मार्गावर रस्त्याच्या शेजारीच उभादांडा येथे हे मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे  दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनादिवशी येथे गणेशाची प्रतिष्ठापना होते.

कोकणातील घराघरांमध्ये गणेशोत्सवात ज्याप्रमाणे पारंपरिक आरास करून ज्याप्रमाणे गणेशपूजा केली जाते त्याचप्रमाणे येथील मंदिरामध्ये  गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. येथील गणेशमूर्ती ही मातीची असते. गावातील गणपतीच्या चित्रशाळेमधून लक्ष्मीपूजनादिवशी वाजत गाजत गणेश मूर्ती आणून मंदिरात बसवली जाते. त्यानंतर मंदिरातील पूजादि विधी सुरु होतात.

या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मी पूजना दिवशी प्रतिष्ठापित होणारी गणेशमूर्ती ५ किंवा २१ दिवसांनी विसर्जित होत नाही. तर येथील गणेश मूर्तीचे विसर्जन हे शिमग्यामध्ये होते. विसर्जन झाल्यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत येथील मंदिरात गणेशाच्या फोटोची पूजा केली जाते. असे हे आगळे वेगळे गणेश मंदिर वेंगुर्ला येथील बस स्टॅंडपासून काही मिनिटांच्याच अंतरावर आहे. त्यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते. तसेच रेडी येथील प्रसिद्ध द्विभूज गणपतीही येथून काही किलोमीटर अंतरावर आहे.  

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021konkanकोकणGanesh Mahotsavगणेशोत्सव