शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Diwali 2020 : नरकचतुर्दशी, बलीप्रतिपदा अशा दिवाळीत येणाऱ्या सणांचे नेमके महत्त्व काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 07:30 IST

Diwali 2020: मोह म्हणजे अंधकार. दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाढ अंधकारातून ज्ञान व प्रकाशाकडे प्रयाण! सुंदर ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला, तर आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव बनेल.

'दिवाळी म्हणजे दीपोत्सव. बाहेर तर दिवे पेटवायचे, पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल, तर बाहेर पेटवलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेन दिवाळीचा सण साजरा करणे', असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर लिहितात. 

धनत्रयोदशीच्या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्याची शक्ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद, अस्वच्छता, अनिष्टता वगैरे नरकासुरांना मारायचा. दिवाळीच्या दिवशी 'तमसो मा ज्योतिर्गमय' मंत्राची साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करायचा. जीवनाच्या वहीचा आढावा घेत, जमेच्या बाजूला ईशकृपा राहावी ह्यासाठी प्रभुकार्याच्या प्रकाशाने जीवन भरून टाकायचे.  नव्या वर्षाच्या दिवशी जुने वैर विसरून शत्रूचेही शुभचिंतन करायचे. नवे वर्ष म्हणजे शुभसंकल्पांचा दिवस. 

हेही वाचा : Diwali 2020 : दिवाळीचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व जाणून घेऊया

नरकचतुर्दशीला कालीचतुर्दशी देखील म्हणतात. नरकचतुर्दशीची कथा अशी आहे.प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वत:च्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता. एवढेच नाही, तर सौंदार्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतावित होता. त्याने स्वत:च्या जनानखान्यात सोळा हजार कन्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. स्त्री-उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्यभामेने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला. भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले. चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला. त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून तिला त्यांनी प्रकाशित करून टाकले. असुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला निघाले. 

दिवाळी म्हणजे व्यापाऱ्यांचा वह्या पूजनाचा दिवस. संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस. या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे. राग, द्वेष, वैर, ईर्ष्या , मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा व उत्साह वाढावा याकडे लक्ष दिले पाहिजे. 

नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात. तेजस्वी वैदिक विचारांची अपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला. त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतीपदेचा उत्सव साजरा केला जातो. बलि दानशूर होता. त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते. कनक व कांता यांच्या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो. म्हणून बलीचा पराभव करणाऱ्या विष्णुने कनक व कांता यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून तीन दिवसांचा उत्सव करण्याचा आदेश दिला. 

दिवाळीच्या दिवशी कनक महणजे लक्ष्मीकडे पाहण्याची पूज्य दृष्टी जोपासण्याचे शिक्षण व भाऊ बीजेच्या दिवशी समस्त स्त्रीजातीकडे आई किंवा बहीण ह्या दृष्टीने पाहण्याचे शिक्षण दिले आहे. स्त्री ही भोग्य नाही, तशी त्याज्यदेखील नाही. ती पूज्य आहे. ही मातृदृष्टी देणारी संस्कृतीच मानवाला विकारांसमोर स्थिर राहण्याची शक्ती देऊ शकते. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रीकडे बंधूच्या निर्व्याज प्रेमाने तिचा बहिण म्हणून स्वीकार करायचा.  मोह म्हणजे अंधकार. दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाढ अंधकारातून ज्ञान व प्रकाशाकडे प्रयाण! सुंदर ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला, तर आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव बनेल.

हेही वाचा : Diwali 2020: लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...शंभर वर्षांपूर्वी दिवाळी कशी होती पहा

टॅग्स :Diwaliदिवाळी