शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

Dhanurmaas 2024: शिशिराची पानगळती, कडाक्याची थंडी, हुरडा पार्टी आणि धुंधुरमासाची सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 10:23 IST

Dhanurmaas 2024: सोमवार १६ डिसेंबर पासून धनर्मास तथा धुंधुरमासाची सुरुवात होत आहे, काय आहे त्याचे महत्त्व? सविस्तर जाणून घ्या!

वसंत, ग्रीष्म, वर्षा ऋतू ही देवीची रूपे आहेत, तर शरद, हेमंत, शिशिर ही देवांची रूपे मानली जातात. शिशिरात कडाक्याची थंडी पडते. दिवस छोटा होऊ लागतो. सकाळी धुक्याची चादर आणि सायंकाळी मिट्ट अंधार. अशात सूर्याचे कोवळे ऊन फार उबदार वाटते. पानाफुलांवरून दवाचे थेंब ओघळू लागतात. पानगळीचा मौसम सुरू झालेला असला, तरीदेखील धरित्री जणू काही जीर्ण वस्त्र टाकून नवयौवनेप्रमाणे तजेलदार भासू लागते. निसर्गाची ही कूसबदल म्हणजेच धुंधुर मास तथा धनुर्मास (Dhanurmaas 2024) ! यंदा १६ डिसेंबर रोजी धनुर्मास सुरू होत आहे, त्याचे महत्त्व जाणून घेऊ. 

शिशिर ऋतूमध्ये सूर्याचे महत्त्व अधिक जाणवू लागते. म्हणून याच काळात सूर्यपूजेशी निगडित अनेक व्रत, पूजा, उत्सव, सण साजरे केले जातात. या उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचा विधी पार पाडला जातो आणि निसर्गाशी जवळीक साधली जाते. अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, रसरशीत फळे बाजारात आलेली असतात. ती पाहून आणि खाऊन तनामनाला उभारी येते. 

शिशिर ऋतु येताच हिवाळा अधिक गडद जाणवू लागतो. त्यालाच धुंधुरमास (Dhundhur Maas 2024)असेही म्हणतात. या काळात भूक खूप लागते, परंतु पचनशक्तीचा वेग मंदावत जातो. त्यामुळे आरोग्यवर्धक आहार डोळसपणे घेतला पाहिजे, यावर आहार तज्ज्ञांचा भर असतो. मात्र, याच काळात व्यायामावर भर देण्याकडेही लक्ष दिले जाते. नवीन वर्ष, गारवा, थंडी, धुके हे सर्व निमित्त साधून प्रभात फेरीची सुरुवात होते. हा काळ आरोग्याच्या कमाईसाठी अनुकूल ठरतो. उत्तरायणाची सुरुवात झालेली असत़े  वर्षभरासाठी सूर्य नमस्काराचा संकल्प देखील केला जातो.

याच काळात अनेक धन धान्य शेतातून घरी आलेली असतात. हे सर्व काही देवाच्या कृपेने प्राप्त झाले, या श्रद्धेने बळीराजा ते देवाला अर्पण करतो. त्यानिमित्ताने अनेक सोहळे साजरे केले जातात. असा हा धुंधुर मास शिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर अर्थात १६  डिसेंबर पासून सुरू होईल. 

या सर्व गोष्टींबरोबर इंग्रजी वर्षाची सांगता काही दिवसांवर येऊन ठेपलेली असल्यामुळेही, २०२४ ला निरोप देण्यासाठी लोक अगतिक झाले आहेत. त्याचवेळेस २०२५ च्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तूर्तास आपण हेमंत सरून सुरू होणाऱ्या  शिशिराचे सोहळे अनुभवूया आणि प्रत्येक दिवस आनंदाने साजरा करूया.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनWinter Foodहिवाळ्यातला आहार