शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Deep Amavasya 2022: अशी करा दिव्यांची विधिवत पूजा आणि न विसरता म्हणा दोन कडव्यांची दिव्याची आरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:32 IST

Aashadh Amavasya 2022: २८ जुलै रोजी दिव्यांची दिवस आहे. त्याची तयारी आणि पूजा विधी व आरती जाणून घ्या.

>> मकरंद करंदीकर 

२८ जुलै रोजी दीप अमावास्या आहे. दिवे उजळून, त्यांची पूजा करून आपण दिव्यांची आवस साजरी करूच. पण त्याला पूर्णत्त्व तेव्हाच येईल, जेव्हा आपण या दीप पूजेची सांगता दिव्यांची आरती म्हणून करू.

पूजा विधी : दीप अमावास्येच्या  दिवशी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत. घरात खूपच दिवे असतील तर नेहेमीच्या पूजेतील, कुटुंबात वंशपरंपरागत असलेले, असे काही महत्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत. शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवावी म्हणजे ओघळणारे तेल त्यात जमा होते. पाटाखाली छोटीसी तरी रांगोळी काढावी. पाट नसल्यास केळीच्या पानावर  दिव्यांची स्थापना करावी. त्यांना हळदीकुंकू, फुले वाहून नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी दूधसाखर, दुधगूळ, लाह्या बत्तासे, पेढे, फळे असे काहीही चालते. उदबत्ती व निरांजन लावून ओवाळावे ( पूजा करावी ). 

दिव्यांसाठी जोड वात : दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड वात लावावी. जीवा-शिवाच्या एकरूपतेचे, अद्वैताचे प्रतीक म्हणून, जोडा सलामत राहावा म्हणून अशी याची कारणे सांगितली जातात. परंतु शास्त्रीय कारण असे की दोन वातींमुळे केशाकर्षण ( कॅपिलरी ऍक्शन ) योग्य प्रकारे होऊन, ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो. अशा प्रकारे दीपपूजा झाल्यावर दिव्याची पौराणिक कहाणी वाचावी. 

Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला वाचा दिव्यांच्या अवसेची कथा; मिळेल उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अपार धनसंपदा!

दिव्याला नैवेद्य : दिव्यांचे तोंड / मुख म्हणजे त्याच्या वाती!  हे तोंड  गोड करण्यासाठी या वाती खडीसाखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात ( पेटवितात ). कांही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी, साखरेचे ४ / ५ दाणे ठेवतात. या दिवशी अनेक समाजात, प्रदेशनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक  छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे. विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर पुरण, उकडीचे मोदक, उकडीचे  दिवे कणकेचे गोड दिवे, मुरड कानवले, दिंड पुरण इत्यादी पक्वान्ने केली जातात. अशा खास पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात. मुले म्हणजे वंशाचे दिवे ! ( मुलगे आणि मुली देखील) म्हणून काहीं ठिकाणी मुलांचे औक्षण केले जाते, त्यांना ओवाळले जाते.

सायंकालीन पूजा :  सायंकाळी सर्व दिवे उजळून ( पेटवून ) आरती करावी. आरतीपुरते घरातील विजेचे लहानमोठे सर्वच्या सर्व  दिवे चालू ठेवावेत. बाहेर काळोख, पाऊस, थंड हवा आणि घरात उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते. या सर्व गोष्टी करतांना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही. देवाला तुमची मनोभावे केलेली भक्ती हवी असते. तुमची चूक झाली तर तो तुम्हाला ठोकून काढीत नाही. त्यामुळे सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा, दडपणाने, भीतीने करू नये.  तसेच सोबत दिलेली दिव्यांची नावे घ्यावीत! 

दिव्यांची/ निरंजनाची आरती : प्रत्येक पूजेमध्ये आपण देवासमोर निरांजन ओवाळून आरती करतो. परंतु दीप अमावस्या हा सण दिव्यांचा, म्हणून या दिवशी दिव्यांची आरती म्हणून पूजेची सांगता करावी. 

पंचप्राणांचे निरांजन करुनी, पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी।मोहममतेचे समूळ भिजवोनि, अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनि ।जय देव जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझिया समचरणा ।।१।।

ज्वाला ना काजळी, ना दिवस ना राती,  सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती।पूर्णानंदे धालो बोलो मी किती, उजळो हे शिवराम भावे ओवाळिती ।जय देव जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझिया समचरणा ।।२।।

Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला पितरांसाठी घराच्या दक्षिण दिशेला न विसरता ठेवा कणकेचा एक दिवा!