शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला वाचा दिव्यांच्या अवसेची कथा; मिळेल उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अपार धनसंपदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:12 IST

Aashadh Amavasya 2022: या पौराणिक कथेत देवी लक्ष्मी जशी प्रसन्न झाली, तशी तुमच्यावरची तिची सदैव कृपादृष्टी राहो!

आषाढ अमावस्येला 'दिव्याची आवस' म्हणतात. गुरुवारी २८ जुलै रोजी दिव्यांची आवस आहे. या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासूनपुसून लख्ख करतात. नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्याभोवती रांगोळी काढात. रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. 'सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वत: तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर' अशी त्याची प्रार्थना करतात. त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तीपूर्वक श्रवण करतात. दिव्याच्या अवसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे. 

ती कथा पुढीलप्रमाणे - 

तामीळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती. त्या दोघांनी स्वत:च्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले. 

पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव 'सगुणा' होते. विनीतला तीन मुलगे झाले. पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती. परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्रय आले. त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले.

पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्यावेळी त्याने आपली बहुमुल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली. ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले. तिने प्रामाणिकपने ती राजाला नेऊन दिली. राजाने खूष होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले. शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले.

तेव्हा तिने `येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील. बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत' अशी इच्छा प्रदर्शित केली. राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले. इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले. नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले, क जी जी सवाष्णबाई घरातघरात प्रवेश करू बघेल, तिच्याकडून `मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही' असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या. 

तिन्ही सांजेच्यावेळी माता लक्ष्मीदेवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधार दिसला. मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते. तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले. लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारीद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली. तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले. त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले. राज्यातील ससर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले.

अशी ही दिव्याच्या अवसेची कथा तुम्हालाही फळो, ही शुभेच्छा!