शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दत्त जयंती: गुरुचरित्राचे पारायण करता? आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; लाभेल मनःशांती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:10 IST

Shree Guru Charitra Aarti: दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. पारायण झाल्यानंतर गुरुचरित्राची आरती म्हणावी.

Shree Guru Charitra Aarti: मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. भक्तीभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पुरक अशा मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. 

दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने  आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. गुरुचरित्र पारायण करताना काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. 

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला आहे. या गुरुचरित्र ग्रंथाची महती आणि महात्म्य सर्वोच्च आहे. तसेच गुरुचरित्राच्या पारायणामुळे अनेकांना अद्भूत अनुभव आल्याचे सांगितले जाते. गुरुचरित्र पारायण करताना त्या दिवसाचे अध्याय वाचून झाल्यावर आरती करावी, असे सांगितले जाते. गुरुचरित्र पारायण झाल्यावर दत्तगुरूंची आरती म्हटली जाते. परंतु, त्याबरोबरच श्रीगुरुचरित्राची म्हणावी, असे म्हटले जाते.

आरती दत्तगुरुंची

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥पराही परतली तेथे कैचा हा हेत ।जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।हरपले मन झाले उन्मन ॥मी तू पणाची झाली बोळवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

आरती श्रीगुरुचरित्राची

मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।नरहरि भारति लीला ब्रह्मादिस्तुत्यं ।कलिमलदाहक मंगलदायक  फलनित्यं ।पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥ जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

त्वद्रतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

अगाध श्रीगुरुकरुणं भूइच्छातरणं ।ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।शारदगंगाधरसुतमथितं नवनीतं ।भाविकभक्तप्रियकर कृतलोककदतं ।तद्रेतशेषं वांछित सखा हरिहरचित्तं ॥ ५ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥

|| श्री गुरुदेव दत्त ||

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्यायspiritualअध्यात्मिक