शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Datta Jayanti 2024: स्त्रियांनी वाचले तरी चालेल, असे 'गुरुचरितामृत'; गुरुचरित्रपारायणाचे मिळते पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:53 IST

Datta Jayanti 2024: आठवड्यावर दत्त जयंती आली, जर गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर सहज सुलभ गुरुचरीतामृत वाचा; अधिक माहिती जाणून घ्या.

यंदा शनिवार १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. या काळात दत्त उपासना म्हणून अनेक जण गुरुचरित्राचे वाचन करतात. मात्र गुरु चरित्राचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक नियम पाळावे लागतात. तसेच गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे की नाही याही बाबतीत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यावर पर्याय म्हणजे गुरुचारीतमृत! याबद्दल अधिक माहिती देत आहेत नांदेडचे  योगेश नं काटे. 

संतकवी श्री  दासगणू महाराज आणि श्री  टेमबेस्वामी :  प.पू.दासगणु महाराज  यांनी  गुरुचरित्रसारामृत नावाची १६ अध्यायी  पोथी लिहली. या पोथीत मोठ्या गुरुचरित्रातील सर्व घटनांचा उल्लेख विस्ताराने केलेला आहे व  विशेष म्हणजे हा ग्रंथ जे  भक्त  सोवळे कर्मठपणाने  इच्छा असुन आचारणात आणण्यास असमर्थ आहेत आशांसाठी  व  स्त्रियांसाठी सुद्धा हे गुरुचरित्रसारामृताचे लिखाण प. पु. दासगणु महाराज  यांनी केले आहे. याला परवानगी प पू.स्वामीनींच दिली आहे असे कुठेतरी वाचले आहे. पण  या ग्रंथाचे ज्या भाविकास पारायण करायचे त्याला साधे नियम पाळावचे लागतील ते  नियम काय व कोणतेआहेत त्याचे विवरण प.पू.अप्पांनी ग्रंथाच्या  सुरुवातीस सांगितले आहे. जिज्ञासु भाविकांनी तो ग्रंथ आवश्य घेवुन पारायण करावे. 

प.पू.स्वामी व प.पू.दादांची भेट दोनदा झाली आहे. पहिली भेट दादा जगन्ननाथाचे दर्शन घेवुन वापस येत असताना राजमेहेंद्रीस उभयतांची भेट झाली या भेटीत प.पू.स्वामीजींनी.प पू दादांना एक श्रीफळ दिले व ते शिर्डी निवासी व  दासगणुमहाराज यांचे सद्गगुरू श्रीसाईबाबा यांना देण्यास सांगितले. साईबाबा श्री  टेंबेस्वमीना त्यांचे वडील बंधु मानीत असत.प.पू. स्वामीजीं विषयी अत्यंत.आदरभावा दादांना होता . स्वामीजींचे  ही दासगणुमहाराजांवर तेवढेच प़्रेम होते. स्वामीजींचे कर्मठ आचारण व सोवळे फार कडक होते.कोणीही त्यांच्याजवळ जाण्यास धजत नसत. मात्र दासगणु महाराजांना त्यांनी कधीच आडवले नाही. हे काही त्यांच्या  शिष्यांना पटले नव्हते व त्यांनी दादांसमोरच त्यांची शंका  स्वामीजींना विचारली त्यावर स्वामीजी  गंमतीने व आराध्याबाबत निष्ठेची परीक्षा पाहावी म्हणून स्वामीजी  म्हणाले "अरे हा पंढरपुरच्या भ्रष्टदेवाचा भक्त कोणीही शिवले तर त्या देवाला चालते.मग हा कशाला फारसे सोवळे - ओवळे पाळतो त्यावर दादा हसले व नम्रपणाने उत्तर दिले  व म्हणाले " महाराज आपल्या दत्तापेक्षा माझा देव पुष्कळ बरा हं! सोवळे कमी आहे पण त्याने धर्म कधी सोडला नाही. दत्तप्रभूंनी मुस्लमानांचे रुप कितीदा तरी घेतले".हे एकताच स्वामीजी खुप मनापासुन हसले समोर बसलेल्या आपल्या शिष्यांना उद्देशुन म्हणाले " आपापल्या आराध्य देवतेवर अशी निष्ठा असावी" आपापल्या अराध्य दैवतेबदद्ल.बोलताना दोघांनाही ही या. एका वैदिक सुत्राचे महत्व  जाणले होते ते म्हणजे " एकं सत् विप्राःबहुधा वदन्ति. 

प.पू.दादा व स्वामीजींची नांदेड येथील भेट :   एकदा योगीराज टेम्बेस्वामीची स्वारी दासगणूच्या कीर्तनासाठी नांदेड येथे  पुंडलिकवाडी  येथे आली.  टेम्बेस्वामी हे. एकनिष्ठ  दत्त भक्त होते म्हणून  दासगणू  महाराजांनी त्यांनी म्हणजे (दासगणु महाराज  यांनी ) रचलेले.श्री एकनाथ चरित्र आख्यान लावले होते. टेमबेस्वामींनी पूर्ण  कीर्तन ऐकले. कीर्तन झाल्यानंतर दासगणु महाराज यांनी  टेम्बेस्वामींचे पाद्यपूजन केले या नंतर  दोघात हितगुजाच्या गोष्टी झाल्या व दासगणु महाराज यांनी  स्वामी महाराजांना विनंती केली  'शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमवि आता' हे पद ऐकविण्याची विनंतीपूर्वक इच्छा प्रदर्शित केली. तेंव्हा स्वामींनी ते पद म्हटले. दासगणुं महाराज यांनी सुद्धा स्वामीजींच्या इच्छेनुसार  'दत्ता येई हो अवधूता जगन्नाथाच्या नाथा' हे प्रासादिक रसाळ काव्य गायले. नर्मदेकाठी श्रीगरुडेश्वर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दासगणू महाराज गेले  तेंव्हा त्यांनी स्वामींवर एक पद रचलेले आहे.अस म्हणताता की  संतांचे स्वरुप वेगळे व कार्यभाग वेळा असला तरी त्यांच्यात किती एकरुपता असते  या दोन प्रसंगावरुन माझ्या लक्षात आले व वाचकांच्याही लक्षात येईल. 

।। श्रीकृर्ष्णापणमस्तू  ।। 

संदर्भः१) संतकवी दासगणु.महाराज यांचे चरित्र : लेखक: .प्रा.अ.दा.आठवले. २) सत्ससंगती - सुगंध:  लेखक: छगन महाराज बारटक्के ३) गोदातिरीचे संत श्रीदासगणू महाराज विशेषांक

टॅग्स :datta jayantiदत्त जयंतीshree datta guruदत्तगुरुshree gurucharitraसंपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय