शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण, पाहा, महत्त्व अन् चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 07:10 IST

Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023: चातुर्मासातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पाचे व्रताचरण कसे करावे? चंद्रोदय वेळा जाणून घ्या...

Ashadhi Sankashti Chaturthi 2023: मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा आणि अनेक वैविध्य तसेच वैशिष्ट्यांनी भारलेला चातुर्मास सुरू झाला आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासात अनेकविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. तसे पाहिल्यास वर्षभरात अनेक व्रते, सण-उत्सव साजरे केले जातात. वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रतांची आणि सण-उत्सवांचे महत्त्व वेगळे आहे. यातील वर्षभर साजरे केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत म्हणजे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाणारी संकष्टी चतुर्थी. मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या दोन्ही चतुर्थी भाविक मनोभावे साजऱ्या करतात. पैकी वद्य पक्षातील संकष्ट चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करावयाचे व्रताचरण आणि काही प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया...  (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023)

सन २०२३ चे विशेष म्हणजे यावर्षी श्रावण मास अधिक असल्यामुळे वर्षभरात १३ संकष्ट चतुर्थी करण्याचे पुण्य भाविकांना मिळणार आहे. संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.  मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय आहेत. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा. (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023 Date And Time)

आषाढ संकष्ट चतुर्थी: गुरुवार, ०६ जुलै २०२३

आषाढ वद्य चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, ०६ जुलै २०२३ रोजी सकाळी ०६ वाजून ३० मिनिटे.

आषाढ वद्य चतुर्थी समाप्ती: गुरुवार, ०६ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री ०३ वाजून १२ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन गुरुवार, ०६ जुलै २०२३ रोजी करावे, असे सांगितले जाते. (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023 Vrat Puja Vidhi)

गणपती बाप्पाच्या व्रत पूजनाची सोपी पद्धत  

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Chaturmas Ashadhi Sankashti Chaturthi 2023 Chandrodaya Timing) 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ १० वाजून १४ मिनिटे
ठाणेरात्रौ १० वाजून १४ मिनिटे
पुणेरात्रौ १० वाजून १० मिनिटे
रत्नागिरीरात्रौ १० वाजून १० मिनिटे
कोल्हापूररात्रौ १० वाजून ०६ मिनिटे
सातारारात्रौ १० वाजून ०८ मिनिटे
नाशिकरात्रौ १० वाजून १२ मिनिटे
अहमदनगररात्रौ १० वाजून ०७ मिनिटे
धुळेरात्रौ १० वाजून ०९ मिनिटे
जळगावरात्रौ १० वाजून ०६ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे
बीडरात्रौ १० वाजून ०२ मिनिटे
सांगलीरात्रौ १० वाजून ०५ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ १० वाजून ०६ मिनिटे
सोलापूररात्रौ १० वाजून ०० मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे
अकोलारात्रौ १० वाजून ०० मिनिटे
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)रात्रौ १० वाजून ०५ मिनिटे
भुसावळरात्रौ १० वाजता ०५ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
धाराशीवरात्रौ १० वाजून ०० मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे
बुलढाणारात्रौ १० वाजून ०३ मिनिटे
मालवणरात्रौ १० वाजून ०८ मिनिटे
पणजीरात्रौ १० वाजून ०६ मिनिटे
बेळगावरात्रौ १० वाजून ०४ मिनिटे
इंदौररात्रौ १० वाजून ०७ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ १० वाजून ०२ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपती