शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

Chaturmas 2024: चातुर्मास विशेष : रोज एक अभंग, भावार्थ आणि निरूपण : ओंकार स्वरूपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 12:24 IST

Chaturmas 2024: चातुर्मासानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमात आपण संतांनी लिहिलेल्या अभंगांचे चिंतन करत आहोत.

>>रवींद्र वासुदेव गाडगीळ

संत एकनाथांनी श्री दत्त दर्शन त्यांना गुरुकृपेने झाल्यावर स्फुरलेला हा अभंग रचला. साक्षात्कार शब्दांकीत केला आहे. त्याला सुमधुर संगीत दिले आहे आपले बाबूजींचे पुत्र संगीतकार श्री श्रीधर फडके, आणि "बैरागी भैरव" रागात गायले आहे आपले लाडके सुप्रसिद्ध पार्श्वगायक स्वरसम्राट पंडित सुरेश वाडकरजी यांनी.

ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था,  अनाथांच्या नाथा, तुज नमो ।। नमो मायबापा गुरुकृपाघना, तोडी या बंधना, मायामोहा ।। मोहजाळ माझे कोण निरशील, तुजविण दयाळा,  सद्गुरुराया ।। सद्गुरूराया माझा आनंदसागर, त्रैलोक्या आधार गुरुराव।। गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्यापुढे उदास चंद्र रवी ।। रवी शशि,  अग्नि, नेणती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद ।। एका जनार्दनी, गुरु परब्रम्ह, तयाचे पै नाम, सदा मुखी ।।

अतिशय सुंदर शब्द व गायन. सुरांचा पाऊस भक्तिरसात चिंब भिजवणारा. नादब्रह्मची अनुभूति. जो योग्य शिष्य तळमळून आपली साधना ,तप,  प्रार्थना, भजन, पूजन, सेवा, परिश्रम, कर्तव्य, निष्ठा निर्मल अंतःकरणाने गुरूंच्या,  भगवंताच्या चरणी देईल,  त्याला गुरूंचा, प्रभूचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.  गुरूंच्या, प्रभूंच्या सेवेत आपला प्रत्येक क्षण सार्थकी लागला पाहिजे. तो अनाथांचा नाथ आहे, त्याला विनवणी करावी लागत नाही. त्यालाही तुमचे प्रेम हवेहवेसे वाटते. कारण सद्गुरूराया माझा आनंदसागर. 

गीतेत एक श्लोक वाचण्यात आलाच असेल. 

“न तद्भासयते सूर्यो, न शशांको, न पावक: यत्गत्वात निवर्तन्ते तत्धाम परमम मम” ।। तोच हा “रवी, शशि, अग्नि” सद्गुरूराय असे स्वयम प्रकाश, ज्यापुढे उदास चंद्र, रवी, अग्नि. किती सुंदर गीताभाष्य.

दत्तगुरूंचा अवतार हा एक चमत्कार आहे. स्वतःसच भक्ताला समर्पित करणारा हा एकमेव देव म्हणजे गुरु, देव आणि दत्त. त्रिगुणी अवतार.  दत्त म्हणजे स्मरण करताच हाजिर होणारा दाता. वाईट गोष्टींचा कर्दनकाळ. गुरुचरित्रात छान वर्णन केले आहे.

औदुंबर, गाणगापूर, नरसोबाची वाडी, गरुडेश्वर, नारेश्वर, ही दत्तगुरूंची तीर्थे आहेत. नृसिंहसरस्वतींच्या अवतारामुळे दत्त संप्रदाय वाढला. मोगल कालीन सततच्या आक्रमणामुळे येथील जनता भयभीत व दुर्बल झाली होती. मार्गदर्शकच कोणी राहिले नव्हते. कोण कोणाचे ऐकणार व का? म्हणून लोकाभिमुख गुरुसंस्थेच महत्व जे समाजात कमी होत चाललेले होते ते वाढविण्यासाठी दत्तांना अवतार घ्यावा लागला. 

“यदा यदाही धर्मस्य ग्लांनिर्भवती भारत”. त्यांनी वेद, पुराण, सहा शास्त्रे, चौदा विद्या, चौसष्ट कला, उपनिषदे, यज्ञ, पूजा पाठ, भजन, पूजन, कीर्तन, अशा सर्व सामाजिक हिताची देवदेवतांची पुनर्प्रस्थापना करून मानवाला आलेल्या कोणत्याही संकटाला धीराने तोंड देण्यास समर्थ केले व मनाला शांति देऊन, सामाजिक एकता प्रस्थापित केली. मी आहे तुझ्या पाठीशी असा दिलासा योग्य मार्गदर्शन करून दिला. “त्रैलोक्या आधार गुरुराव”

आजही धर्माला ग्लानि आलेली आहे. धर्माचे महत्व समजेनासे झाले आहे. उलट उत्सवी दिखाऊ चंगळवादी कार्यक्रमाचे पूजक बन्या, बापू,  स्वामी,  गुरूंचे पीक आलेले आहे, गुरु, शिक्षक,  आईवडील, ज्येष्ठ ,श्रेष्ठ ,आदर्श, आदरणीय व्यक्तीचे अवमूल्यन झपाट्याने होत आहे. गुरुच शेवटी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी आशा करू या. श्रीगुरूदेव दत्त. 

टॅग्स :chaturmasचातुर्मास