शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

chaturmas 2022: आज कांदे भजी खाण्याचा अधिकृत दिवस, अर्थात चातुर्मासापूर्वीची कांदेनवमी; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:46 IST

chaturmas 2022: पाऊस, चहा आणि कांदे भजी हे अलिखित समीकरण आहे. परंतु आषाढी एकादशीपासून कांदे भजी यातून बाद होणार, म्हणून आज तिचा उत्सव!

काही गोष्टी धर्मशास्त्रात लिहिलेल्या नाहीत, परंतु परंपरेने त्याचे पालन होत तो अलिखित नियम बनत जातो. त्याचेच एक उदाहरण म्हणजे चातुर्मास सुरू होण्यापूर्वी येणारी नवमी ही कांदेनवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील उरले सुरले कांदे-लसूण भजी-चटणी स्वरूपात संपवले जातात आणि चातुर्मासात कांदा-लसूण आहारातून बाद केला जातो. १० जुलै रोजी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे, त्याची ही पूर्वतयारी!

व्रत वैकल्याच्या वेळेस सात्विक भोजन करावे, असे शास्त्र सांगते. त्यानुसार मांसाहार तर दूरच पण कांदा लसूण हे तामसी वृत्ती वाढवणारे पदार्थ देखील आहारातून वगळले जातात. कांदा-लसूण व्यर्ज्य का? 'पलाण्डुभक्षणं पुनरुपनयन्' ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे सांगण्यात येते. धर्मशास्त्राने कांद्याचा महानिषेध केलेला आढळतो. वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद तसे निषिद्ध आहेत. पण हिंदू धर्मात विशेषकरून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानले जातात. 

कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रयोग झाले आहेत. कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा असतो. म्हणून कांद्याला मदन म्हटले आहे. विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णासारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग्यास लसूण उपकारक मानला जातो. त्याप्रमाणे कांदा उष्णताराहक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात. पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात, त्याचा सर्रास वापर केल्यास ते पकृतीस, संस्कारास, विचारास हानिकारक ठरतात. कांद्याचा वापर सोवळ्याच्या स्वयंपाकात करत नाहीत. नैवेद्य, धार्मिक विधी, व्रतवैकल्य इ. प्रसंगी जेवणात कांदा, लसूण वापरला जात नाही. 

उपासाच्या दिवशी तसेच सकाळच्या वेळी कांदा, लसूण टाळणे इष्ट ठरते. कांदा, लसूण सोडा असे सांगणे कदाचित आताच्या काळात शक्य होणार नाही, कारण तो सर्वांच्याच आहाराचा भाग झाला आहे. परंतु आपल्याकडे म्हण आहे त्याप्रमाणे, ऊस गोड लागला, म्हणून तो मूळासकट खाऊ नये. धर्मशास्त्राची बंधने देखील त्यासाठीच आहे. जीभेचे चोचले न संपणारे आहेत. ते पुरवताना हयात खर्च होते. म्हणून योग्य वेळी पारमार्थिक ध्यान लावण्यासाठी, धर्मशास्त्राचे उपदेश जरूर पाळावेत आणि आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी, हेच योग्य ठरते. 

ही सर्व माहिती पाहता, पुढचे चार महिने कांदा लसूण सोडण्याचा संकल्प करण्यासाठी आज कांदेनवमीच्या मुहूर्तावर यथेच्छ कांदेभजी खाण्याचा विकल्प कोणा खवय्याने शोधून काढला आहे. तुम्ही सुद्धा हा संकल्प सोडण्यास कटिबद्ध असाल, तर लगोलग टाका कढई, घाला तेल आणि डाळीच्या पिठात कांदा, तिखट, मीठ, मसाला घोळवलेली कुरकुरीत कांदेभजी खा आणि कांदे नवमीचा पुरेपूर आनंद लुटा!

टॅग्स :foodअन्न