शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे- स्वामी समर्थ

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 26, 2020 12:05 IST

आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील, तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबिरी, प्रेरक विचार लावलेले असतात. का? तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून! परंतु, आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र, कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे-

कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका,मोठ्याने बोलू नका,मन शांत ठेवा, विचार करा,नंतर अंमलबजावणी करा,त्रास फक्त तुम्हालाच, मन:शांती सुद्धा तुम्हालाच!विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.

हेही वाचा : श्रीगुरुचरित्र वाचायला वेळ नाही? मग एकदा हा दत्तगुरुंचा झरा वाचाच!

हे विचार नित्य आचरणात आणले, तर आपले आयुष्यच बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो. भांडण-तंटे होतात. अपशब्द काढले जातात. वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मन:स्वाथ्य बिघडते आणि वरचेवर रागावण्याच्या, मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इ. आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरु होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. हे प्रकरण तिथे थांबत नाही, तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते.

यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागावू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली, तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो. त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. 

रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी-मनीही नसते, तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे, तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा. विचार करा. विचार कसला? तर खरेच रागावण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या गोष्टींचा विचार केला, तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे, त्याची तीव्रता कमी होईल. मन शांत होईल. एखादवेळेस तुम्हाला हे जमले, की कायमस्वरूपी तुम्ही स्वत:च्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. 

या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे, ते म्हणजे ` विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशिब बदलेल.' आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील, तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. आपण जी कृती करतो, त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून, आपली परिस्थिती बदलण्याचे सामथ्र्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल. 

स्वामींची ही शिकवणी आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया.

हेही वाचा : तुम्ही किती वेळा अलार्म बंद करता, यावरून ओळखा तुमचे व्यक्तिमत्त्व!