शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

विनायक चतुर्थीला अंगारक योग: प्रभावी गणपती अथर्वशीर्ष नियमित म्हणता? ‘या’ चुका होत नाही ना?

By देवेश फडके | Updated: March 31, 2025 21:14 IST

Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025: नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप ठरते, असे सांगितले जाते. गणपती अथर्वशीर्ष पठण करताना १५ नियम पाळायलाच हवेत. जाणून घ्या...

Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ ३० मार्च २०२५ पासून हिंदू नववर्षाला सुरुवात झाली. गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर, ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी आहे. विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे अतिशय शुभ, पुण्याचे मानले गेले असून, यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. ०१ एप्रिल २०२५ रोजी चैत्र शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. यानिमित्ताने गणपतीच्या विशेष पूजनासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळेस आवर्जून गणपती अथर्वशीर्ष या अत्यंत प्रभावी स्तोत्राचे पठण केले जाते. 

प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. 

नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप होते

विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. अंगारकी विनायक चतुर्थीला उपवास करण्यासह बाप्पाची मनोभावे उपासना केली जाते. गणपतीचे अनेक प्रभावी मंत्र, स्तोत्रे या दिवशी म्हटले जातात. यापैकी गणपती अथर्वशीर्ष हे सर्वाधिक प्रभावी मानले जाते. काही घरांमध्ये नियमितपणे पठण केले जाते. मात्र, गणपती अथर्वशीर्ष म्हणताना काही गोष्टींचे भान ठेवावे लागते. नियम पाळावे लागतात. नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप ठरू शकते, असे सांगितले जाते. 

अथर्वशीर्ष हे एक उपनिषद, गणपतीच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन 

अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे. या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे. गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात, कणाकणात सामावला आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.

गणपती अथर्वशीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होऊ शकते

गणपती अथर्वशीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरुपाची प्रचिती देणारे आहे. गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. 

गणपती अथर्वशीर्ष पठण करताना १५ नियम पाळायलाच हवेत

- गणपती अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावे.

- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.

- देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे. 

- पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे. 

- स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत.

- स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिर्भूतता पाळावी.

- अथर्वशीर्षाचा पठण करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. 

- गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी. 

- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान, स्मरण करावे, नमस्कार करावा.

- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.

- एकापेक्षा अधिक वेळा अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.

- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

- सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर ३,७,९,११, २१ वेळा आवर्तने करावीत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा, तरच लाभ होईल.   

- गणपती अथर्वशीर्ष पाठ नसेल तर श्रवण करावे. मात्र, डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवावे. जेणेकरून मन भटकणार नाही आणि उद्देश पूर्ण होईल, असे सांगितले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

टॅग्स :vinayak chaturthiविनायक चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी