शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
3
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
4
"गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
5
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
6
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!
7
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
8
शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य?
9
IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार, KKR च्या इनिंगमध्ये दोन वेळा घडली अशी घटना
10
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
11
अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड
12
"दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज’’,हर्षवर्धन सपकाळ .
13
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
14
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
15
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
16
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
18
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
19
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
20
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?

चैत्र श्री लक्ष्मी पंचमी: लक्ष्मी देवीचे ‘हे’ प्रभावी स्तोत्र म्हणा; अपार कृपेचे धनी व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:01 IST

Chaitra Shree Lakshmi Panchami 2025: श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी व्यस्त दिनचर्येतून हे स्तोत्र आवर्जून म्हणावे, असे म्हटले जाते.

Chaitra Shree Lakshmi Panchami 2025: ३० मार्च २०२५ पासून हिंदू नववर्ष सुरू झाले. या वर्षातील पहिले चैत्र नवरात्र सुरू आहे. चैत्र नवरात्रात दैवीच्या विविध स्वरुपांचे अगदी मनोभावे पूजन केले जाते. चैत्र शुद्ध पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. ०२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र नवरात्रातील पंचमी तिथी असून, चैत्र शुद्ध पंचमी श्री पंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाते. धन, धान्य, वैभव, सुख, समृद्धी, ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचे या तिथीला विशेष पूजन केले जाते. श्री लक्ष्मी पंचमी या दिवशी लक्ष्मी देवशी संबंधित श्लोक, स्तोत्रे, मंत्रांचे जप आवर्जून केले जातात. लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहावी, असे सगळ्यांनाच वाटत असते. 

लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही. जिथे आळस, नैराश्य, अपयशय आहे, तिथे ती घटीकाभर देखील थांबत नाही. लक्ष्मीची साथ सुटली की, व्यक्ती रसातळाला जाते, असे म्हटले जाते. लक्ष्मी देवीला धन, वैभव, सुख, समृद्धी, विष्णुप्रिया मानले जाते. चैत्र शुद्ध पंचमी तिथीला लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते. धनलाभासह अनेकविध फायदे मिळू शकतात, असे सांगितले जाते. श्री लक्ष्मी पंचमीला आपापले कुळाचार, कुळधर्म, रिती-परंपरा यांनुसार लक्ष्मी देवीचे पूजन केल्यानंतर लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या काही गोष्टी अर्पण कराव्यात. लाल फूल अर्पण करावे. शक्य झाल्यास कमळाचे फूल अर्पण करावे. लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी नारायण स्तोत्राचे पठण करावे. कनकधारा स्तोत्र, श्रीसुक्त यांचे पठण करावे. स्तोत्रांचे पठण शक्य नसल्यास मनोभावे श्रवण करावे. तसेच लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. 

व्यस्त दिनचर्येतून हे स्तोत्र आवर्जून म्हणावे

घरात सुख-समृद्धी, संपन्नता लाभावी, यासाठी माणूस सतत प्रयत्नशील, कार्यरत, मेहनत, परिश्रम घेत असतो. या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली, तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. म्हणूनच प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी, असे शास्त्र सांगते. स्तोत्र पठणाचा आणखी एक लाभ म्हणजे, आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे. तेच प्रभावी शब्द स्तोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. व्यस्त दिनचर्येतून हे स्तोत्र आवर्जून म्हणावे, असे म्हटले जाते. शक्यतो हे स्तोत्र सायंकाळी दिवलागणीला म्हणावे, असा सल्ला अनेक जण देतात.

श्री अष्टलक्ष्मी स्त्रोतम

आदि लक्ष्मी:

सुमनस वन्दित सुन्दरि माधवि चंद्र सहोदरि हेममये ।मुनिगण वन्दित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिणि वेदनुते ।

पङ्कजवासिनि देवसुपूजित सद-गुण वर्षिणि शान्तिनुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि परिपालय माम् ।

धान्य लक्ष्मी:

अयिकलि कल्मष नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।क्षीर समुद्भव मङ्गल रुपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।

मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।

धैर्य लक्ष्मी:

जयवरवर्षिणि वैष्णवि भार्गवि मन्त्र स्वरुपिणि मन्त्रमये ।सुरगण पूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनि शास्त्रनुते ।भवभयहारिणि पापविमोचनि साधु जनाश्रित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदापालय माम् ।

गज लक्ष्मी:

जय जय दुर्गति नाशिनि कामिनि वैदिक रूपिणि वेदमये ।रधगज तुरगपदाति समावृत परिजन मंडित लोकनुते ।हरिहर ब्रम्ह सुपूजित सेवित ताप निवारिणि पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम् ।

सन्तान लक्ष्मी:

अयि खगवाहिनी मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये ।गुणगणवारिधि लोकहितैषिणि सप्तस्वर भूषित गाननुते ।सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि परिपालय माम् ।

विजय लक्ष्मी: 

जय कमलासनि सद-गति दायिनि ज्ञानविकासिनि गानमये ।अनुदिन मर्चित कुङ्कुम धूसर भूषित वसित वाद्यनुते ।कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्करदेशिक मान्यपदे ।जय जय हे मधुसूदन कामिनि विजयक्ष्मि परिपालय माम् ।

विद्या लक्ष्मी:

प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये ।मणिमय भूषित कर्णविभूषण शान्ति समावृत हास्यमुखे ।नवनिद्धिदायिनी कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते ।जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् ।

धन लक्ष्मी:

धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि-दिन्धिमी दुन्धुभि नाद सुपूर्णमये ।घुमघुम घुङ्घुम घुङ्घुम घुङ्घुम शङ्ख निनाद सुवाद्यनुते ।वेद पुराणेतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते ।जय जय हे कामिनि धनलक्ष्मी रूपेण पालय माम् ।

अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।विष्णुवक्षःस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिनी ।।शङ्ख चक्र गदाहस्ते विश्वरूपिणिते जयः ।जगन्मात्रे च मोहिन्यै मङ्गलम शुभ मङ्गलम ।

। इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम सम्पूर्णम ।

॥ ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्॥

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक