शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Chaitra Navratri 2024: आज दुर्गाष्टमीच्या निमित्ताने छोट्याशा कुमारिकेचे करा पूजन; चैत्रगौर होईल प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 10:38 IST

Chaitra Navratri 2024: कुमारिकेला आपण देवीचे स्वरूप मानतो, म्हणून दहा वर्षांखालील कोणत्याही कन्येचे आज पूजन करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा; वाचा विधी!

वर्षभरातून आपण तीन वेळा नवरात्रोत्सव साजरा करतो. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. या तीनही नवरात्रीत आपण शक्तीपूजन करतो. तीनही नवरात्रीत आपण हळदी कुंकू समारंभ करून स्त्रीशक्तीचा गौरव करतो. तसेच नवरात्रीत मान असतो कुमारीकांचा. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, असे मानले जाते. म्हणून नवरात्रीत नऊ दिवसांमध्ये विशेषतः सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला कुमारिकेची पूजा करतात.

कुमारिकेचीच पूजा का? 

देवी भागवतात म्हटले आहे, की दोन ते दहा वर्षांच्या मुलींना अर्थात वयात न आलेल्या मुलींना कुमारिका म्हणून बोलवावे. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या मुलीला कल्याणी, पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी, सहा वर्षाच्या मुलीला कालिका, आठ वर्षांच्या मुलीला शांभवी, नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्यारूप मानले जाते. वयात आल्यानंतर मुलींमध्ये राग, लोभ, विकार, वासना यांची वृद्धी होऊ लागते. परंतु कुमारिका अल्लड, निरागस आणि निर्विकार असतात. बालरूपात आपण देव पाहतो. म्हणून कुमारिकांना पूजेचा मान दिला जाता़े कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुषय, बळ वृद्धिंगत होते. तसेच त्यांच्या शुभाशिर्वादाने घरात सुख, समृद्धी, शांती येते.

कुमारिका पूजन पुढीलप्रमाणे करावे-

नवरात्रीत नऊ दिवसात कधीही किंवा सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी विशेषतः कुमारिका पूजन करतात. पायावर दूध-पाणी घालून स्वागत करतात. हळद-कुंकू लावून औक्षण करतात. त्यांना आवडेल अशी भेटवस्तू देतात. देवीला स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून कुमारिकेला जेवू घालतात. देवीचा नित्यसहवास मिळावा आणि तिची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी, आपण हे व्रत करतो. बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हेदेखील त्याचेच एक प्रतीक. 

दहा वर्षांपर्यंतच्या कुमारिकांना आपण कुमारिका पूजनासाठी बोलावतो. तान्ह्या बाळापासून दहा वर्षांच्या कुमारिकेपर्यंत देवीच्या कन्या रूपाची पूजा केली जाते. त्याचे फलित काय मिळते तेही जाणून घेऊ. 

दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३