शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत आवर्जून टाळा 'या' चुका; तरंच मिळेल चैत्र गौरीचा आशीर्वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 15:02 IST

Chaitra Navratri 2024: यंदा ९ ते १७ एप्रिल चैत्र नवरात्र साजरी केली जाते, तिलाच श्रीराम नवरात्र असेही म्हणतात; या काळात कोणत्या चुका टाळायच्या ते पाहू.  

चैत्र नवरात्र यंदा ९ एप्रिल सुरू होत आहे. हे नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत आहे आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन ९ दिवस दुर्गेच्या ९ रूपांची पूजा केली जाते. दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती होते. दुर्गा माता मनोकामना पूर्ण करते. देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी पुढे दिलेल्या नियमांचे अवश्य पालन करा. 

नवरात्रीत या चुका करू नका

>> चैत्र नवरात्रीचा उपास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपास करावा. तो शक्य नसेल तर फलाहार करावा. उपास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्त्विक भोजन ग्रहण करावे. 

>> उपसाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये. ज्यांचा उपास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा. मनात तामसी विचारही आणू नये. 

>> शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण व्यर्ज करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे. 

>> उपासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालय नैसर्गिक मिठाचा वापर करावा. 

>> या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये. व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील, तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल.

>> या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे. 

>> या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी. जमिनीवर सतरंजी अंथरून निजावे. देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतींमागील गमक मानले जाते. 

>> नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी, शुचिर्भूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नयेत. 

>> या काळात ब्रह्मचर्य पाळा. जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल. 

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३