शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

Chaitra Navratra 2022 : देवीची शीघ्रकृपा प्राप्त व्हावी, म्हणून चैत्रपंचमीला 'असे' कुंकुमार्चन करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:54 IST

Chaitra Navratra 2022 : कुंकुमार्चन हादेखील नवरात्रीतील एक उपचार आहे. तो केला असता देवीची शीघ्र कृपा होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

चैत्र नवरात्रीत शारदीय नवरात्रीप्रमाणे देवीपूजन, घटाचे पूजन याच बरोबर कुमारिका पूजन, सौभाग्यवती पूजन इ. परंपरेला महत्त्व आहे. देवीची कृपादृष्टी व्हावी, म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन. नवरात्रीत, विशेषतः पंचमीला, अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो. ६ एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीतील पंचमी तिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया या विधीचे महत्त्व. यासंदर्भांत पालघर येथील ज्योतिषतज्ञ राणे गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे, ती जाणून घेऊ. 

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.

कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपुजन, मंगळवार, शुक्रवार किंवा नवरात्रीतील पंचमी, अष्टमी, नवमी तिथी अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते. विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा.  

कुंकुमार्चन पूजा विधी :- 

एका तांब्याच्या किंवा पितळेच्या / चांदीच्या ताम्हणमध्ये देवी ची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट) पात्रात घेऊन शुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. लाल फुले,गुलाब वाहणे. शक्य असल्यास ताम्हणात हि फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप – धूप लावावा. गायीच्या तुपाचा दिवा लावावा, (शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.)

त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत, अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक-एक नामाचा जप करत, अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता “मृगी मुद्रेने” म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट या पहिल्या तीन बोटांनी कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे. काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासुन सुरु करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी.

कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता.

‘मूळ कार्यरत शक्तीलतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीकतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या  सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’

टॅग्स :Navratriनवरात्री