शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
4
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
5
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
6
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
7
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
8
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
9
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
10
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
11
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
12
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
13
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
14
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
15
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
16
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
17
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
18
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
19
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
20
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान

Career Astro Tips: मुलांचे करिअर निवडताना त्यांची आवड आणि व्यवसायाला पूरक ग्रहदशा अवश्य बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:41 IST

Career Astro Tips: दहावी-बारावीच्या निकालानंतर 'पुढे काय?' या मुलांच्या करिअरचा मागोवा घेणारा प्रश्न उभा राहतो तेव्हा ग्रहांची साथ मार्गदर्शक ठरते (भाग १)

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आपण घेतलेले शिक्षण, नोकरी आणि  व्यवसाय ह्याचा अनेकदा एकमेकांशी काहीही संबंध नसतो असे दिसून येते. आपण जे शिक्षण घेतले त्याला अनुसरून नोकरी नाही मिळाली म्हणून मग नोकरी मिळेल असे शिक्षण घ्यावे लागते आणि त्यातच वयाची पंचविशी उलटते. टेक्निकल आणि व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीचे शिक्षण घेणे आजकाल आवश्यक आहे. पण त्यासाठी पूरक ग्रहदशा आहे का ? हे आज आपण व्यवसाय आणि नोकरीसाठी लागणारे ग्रहयोग या अनुषंगाने बघुया.

इंजिनिअरींग हे क्षेत्र मोठे असून त्यात विविध शाखा येतात. ह्यासाठी प्रामुख्याने मंगळ पाहावा. त्याच्या राशी आणि त्याचा दशम भावाशी असलेला संबंध . ४, ५, ८ ह्या ठिकाणी मंगळाच्या राशी असतील तर चांगलेच. मंगळ हा मेकॅनिकल रसायने, रवी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, शनी सिव्हील इंजिनिअरिंग,  भूगर्भ . संगणक म्हणजेच कॉम्पुटर क्षेत्रासाठी बुध , गुरु हर्शल चांगले. गुरु हा उच्च तंत्रज्ञान तसेच शनी अत्यंत संयम, चिकाटी देतो तसेच मंगळ इंजिनिअरींगशी संबंध देतो. बुध हा उत्तम संवाद कौशल्य देतो . शब्दांच्या कोट्या करणारा हा बुध पत्रिकेत उत्तम फलित देत असेल तर कुठल्या क्षेत्रात आपण यश संपादन करू शकतो ते बघुया.

लग्न भावात किंवा धन भावात बुध तसेच २, ६, १०, ६ ह्या भावांशी जर मंगल गुरु बुध संबंधित असतील, तर व्यक्ती वकिली क्षेत्रात नाव मिळवेल. पंचम , लाभ भावातील शनी सुद्धा वकिलीसाठी पूरक ठरतो. वकील म्हणून व्यवसाय करायचा असेल तर लाभस्थान आणि लाभेश शुभ हवेत तसेच लग्नात ५, ७, ९, १० ह्या लग्न राशी हव्यात.

केंद्रात शुभ गुरु, शनी व्यक्तीला उत्तम न्यायाधीश बनवतात. न्यायाधीश होण्यासाठी लग्नेश बलवान आणि ६, १० ह्या भावात शुक्र गुरु शनी हे ग्रह परस्परांशी संबंधित असावेत. हे अधिकार देणारे ग्रह आहेत. लग्न दशम भावातील राहुसुद्धा उच्च फलित देतो. शनी ५ ,११ मध्ये असावा. ४, ९ ह्या भावांची दशा उच्च शिक्षण देईल, पण नोकरी देणार नाही . 

शिक्षण घेताना पुढे नोकरीसाठी असलेल्या दशांची सांगड घालणे आवश्यक असते. दशा मार्ग दाखवतेच . जसे नवम भावाच्या दशेत पर्यटन , प्रोफेसर गुरूशी संबंधित व्यवसाय केले तर उत्तम होईल. षष्ठ भाव असेल तर घरी खाद्य पदार्थ करून त्याचा व्यवसाय करावा. पंचम भाव हा कलेचा कलात्मक आहे. मुलांच्या शिकवण्या , कला अवगत असेल तर तबला पेटी हेही शिकवता येईल.

ज्योतिष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशा विविध पत्रिका संग्रहित करून त्यातील नियम अभ्यासावे . कदाचित अजूनही काही नियम निघू शकतील, त्याचेही अध्ययन करावे. प्रत्येक विषयाचे मनन , चिंतन आवश्यक आहे. पुढील भागात इतर व्यवसाय बघुया.

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन