शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आपल्याला आपल्या क्षेत्रात सचिनसारखी उंची गाठता येईल का? जाणून घ्या त्याच्या यशाचे गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:39 IST

मास्टरब्लास्टर सचिनने आज वयाची हाफ सेंचुरी पूर्ण केली, त्यानिमित्ताने त्याच्या प्रवासाचे आणि निवृत्तीनंतरच्याही लोकप्रियतेचे गमक जाणून घेऊ. 

क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस. त्याने वयाची ५० वर्षे पूर्ण केली. क्रिकेट क्षेत्रातला हा विक्रमादित्य निवृत्ती नंतरही आपली लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर आधीपासूनच सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडू लागला आहे आणि आज तर यत्र तत्र सर्वत्र त्याचेच नाव घेतले जात आहे. हे यश मिळण्यामागे त्याचे कठोर परिश्रम आणि सचोटी तर आहेच, पण त्याही पलीकडे आहे एक शिस्त, कोणती ते जाणून घेऊ!

आपण सर्वांनी सचिनला खेळताना पाहिले आहे. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून २० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा एका मुलाखतीत त्याला विचारले गेले, 'तुमच्या यशाचे रहस्य काय?'सचिनने सांगितले, मी क्रिकेट फक्त खेळत नाही, तर क्रिकेट जगतो. दिवसाचे २४ तास, प्रत्येक क्षण मी क्रिकेटबद्दल विचार करतो. क्रिकेट शिकायला सुरुवात केली, त्या दिवसापासून एकही सकाळी ६ वाजताचा सराव मी चुकवलेला नाही.'मुलाखतकाराने विचारले, `पण आदल्या दिवशीच्या मॅचमध्ये तुम्ही सेंच्युरी किंवा डबल सेंच्युरी घेतली असेल तर?त्यावर सचिनने सांगितले, `तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मी सरावाला हजर असेन!'मुलाखतकार म्हणाला, 'पण तुम्हाला उत्सुकता नसते का? की कालच्या खेळीबद्दल पेपरमध्ये आपल्याबद्दल काय छान छान छापून आले असेल? किंवा एखाद्या लेखात कोणी शेरेबाजी केली असेल, याची काळजी वाटत नाही का?'सचिन म्हणाला, 'मी सरावाला गेल्यावर ५०० धावांचे ध्येय पूर्ण केल्याशिवाय पेपर हातातही घेत नाही. आधी खेळ मग कौतुक! मी माझा सराव सोडून स्वत:चे कौतुक वाचत बसलो, तर मी आता जिथे आहे, तिथे राहू शकणार नाही आणि जिथपर्यंत मला पोहोचायचे आहे, तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही!'

हेच आहे सचिनचे 'सचिनपण'! स्वप्न सगळेच पाहतात, परंतु सगळेच जण कठोर परिश्रम घेतात असे नाही. सामान्य प्रयत्नांनी व्यक्ती सामान्य राहते, तर असामान्य प्रयत्नांनी असामान्य बनते. परंतु, त्यासाठी अविश्रांत मेहनत आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास घ्यावा लागतो. 

रोज नवीन दिवस उगवतो. त्या दिवसाचा वापर कोण कसा करतो, यावर प्रगती अवलंबून असते. पळतात सगळेच, पण ध्येयाच्या दिशेने पळणारे कमी असतात. आपले ध्येय मिळवण्याचा ध्यास, त्यासाठी केलेली आखणी, परिश्रम, स्वत:ला सतत प्रोत्साहित ठेवण्याची तयारी, अडचणींवर मात करायची तयारी मनुष्याला समृद्ध बनवते. आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवते. 

आजवरच्या सर्व यशस्वी लोकांची आत्मचरित्रे वाचली, तर एक गोष्ट लक्षात येईल, की ते सगळेच जण सकाळी लवकर उठत असत़  उठल्यावर पहिला एक तास आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींना देत असत. त्या सकाळच्या एका तासात कमावलेली सकारात्मक ऊर्जा दिवसभर वापरत असत.

यावरून शिकण्यासारखे हेच आहे, की केवळ सचिन आवडतो, एवढे म्हणून भागणार नाही, तर सचिन सारखे बनायचे असेल, तर कठोर आणि प्रामाणिक परिश्रमाची तयारी हवी. प्रत्येक काम कर्तव्यबुद्धीने आणि ईश्वराप्रती श्रद्धा ठेवून आत्मविश्वासाने केले, तर आणि तरच आपल्याला आपले ध्येय पूर्ण करता येईल, तसेच आपल्याला आपल्या क्षेत्रात सचिनसारखी भरीव कामगिरी करता येईल. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर