शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Buddha Purnima 2022 : यंदा बुद्ध पौर्णिमेला करा भगवान बुद्धांना प्रिय असलेल्या 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 13:44 IST

Buddha Purnima 2022: शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान बुद्ध यांच्या कार्याची उजळणी हेच खरे बुद्ध जयंतीच्या उत्सवाचे मूळ रूप आहे.

असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो. भारत आणि जगात बरीच संयुक्त मंदिरे आहेत जी भगवान बुद्ध आणि विष्णू यांना समर्पित आहेत. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. चला उत्सवाची परंपरा जाणून घेऊया. यंदा १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. 

१. भगवान बुद्ध यांचा जन्मदिन म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खीर केली जाते आणि खीर भगवान बुद्धांना अर्पण केली जाते. 

२. आजच्या दिवशी बौद्ध प्रार्थना स्थळ फुलांनी सजवले जाते व बौद्ध प्रार्थनांचे आयोजन केले जाते.

३. सूर्योदयाच्या अगोदर प्रार्थना स्थळांवर सर्व अनुयायी एकत्र जमतात. भजन, वाचन, गायन करून जयंती साजरी करतात. 

४. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर बौद्ध प्रार्थना स्थळांवर बौद्ध ध्वज फडकविला जातो. हा ध्वज निळा, लाल, पांढरा, पिवळा आणि केशरी रंगाचा असतो. लाल आणि निळा रंग आशीर्वादाचा, पांढरा रंग धर्म शुद्धतेचे प्रतीक, केशरी रंग बुद्धिमत्तेचे प्रतीक आणि पिवळा रंग कठीण परिस्थितीतून जगण्याचे प्रतीक मानला जातो. 

५. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी अनेक गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र दान केले जाते. 

६. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काहीजण पक्षी व पिंजऱ्यात कैद असलेल्या प्राण्यांना मुक्त करून हा दिवस साजरा करतात.

७. या दिवशी भगवान बुद्ध यांचे अनुयायी घरात दिवे लावतात आणि घर फुलांनी, दीपमाळांनी सजवले जाते. 

८. जगभरातील बौद्ध अनुयायी आजच्या दिवशी बोधगया येथे जातात आणि प्रार्थना करतात.

९. भगवान बुद्ध यांच्या चरित्राचे त्यांच्या शिकवणुकीचे सामूहिक वाचन, चिंतन करतात. 

१०. आजच्या दिवशी भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून आजच्या दिवशी बोधी वृक्षाचे पूजन केले जाते. 

१२. भगवान बुद्धांचे अनुयायी आजच्या दिवशी मांसाहार व्यर्ज करतात. कारण भगवान बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होते. 

१३. आजच्या दिवशी बौद्ध धर्मगुरुंकडून सर्व अनुयायांना भगवान बुद्धांनी दिलेल्या शांतिमय जीवनाचे स्मरण करुन दिले जाते आणि त्यांनीही शांततेचा मार्ग अनुसरावा अशी शिकवण दिली जाते.