शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली....तो आजचाच दिवस!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 28, 2021 2:48 PM

महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. त्याचा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहतिथी मानली जाते. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

'येळकोट येळकोट...जय मल्हार' म्हणत लाखो लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सातारा येथील पाली मध्ये पार पडतो. मात्र, यंदा हा विवाह सोहळा मोजक्या मानकऱ्यांच्या साक्षीने दोन दिवसांपूर्वीच संपन्न झाला. प्रथेनुसार पेंबर गावातील मुख्य मंदिरातून देवाचे मुखवटे मानकरी नदीपलीकडे घेऊन जातात. यावेळी हे मुखवटे पालखीतून वाजत गाजत विवाहासाठी नेले जातात. यानंतर विवाह मंडपात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा म्हाळसेचा विवाह सोहळा संपन्न होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाली खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली. मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देवाचे धार्मिक विधी पार पाडण्यास शासनाने अनुमती दिली होती, त्यानुसार हा विवाहसोहळा पार पडला. 

महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. जेजुरीच्या खंडोबाला मल्हारीमार्तंड, म्हाळसाकांत, मल्हारी अशा अनेक नावांनी गौरवले गेले आहे. त्याच्या पत्नीचे नाव म्हाळसा. ती तिम्मशेट वाण्याची मुलगी. तिम्मशेटला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्यानुसार स्वप्नपूर्ती करण्यासाठी तिम्मशेटनी तिचा विवाह खंडोबाशी करून दिला. हा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहतिथी मानली जाते. 

या विवाहदिनाची आठवण जागवणारा सोहळा सणासारखा साजरा होतो. हा एक लोकोत्सव आहे. पिढी दरपिढी चालत आलेल्या रितिरिवाजाप्रमाणे तो साजरा केला जातो. आपल्या लोकसंस्कृतीचा जवळून परिचय व्हावा, म्हणून प्रत्येकाने एकदा तरी या पवित्र विवाहसोहळ्यात उपस्थित राहून हे `देवकार्य' बघावे. शक्य झाल्यास आर्थिक मदत करावी. 

खंडोबाच्या लग्नाची अनेक लोकगीते प्रचलित आहेत. त्यापैकीच एक गीत जागरणाच्या वेळेस म्हटले जाते. आपणही खंडोबा आणि म्हाळसा विवाहप्रित्यर्थ ते गाणे म्हणून या विवाहसोहळ्याचा आनंद अनुभवूया.

म्या पाहिला पिवळा झेंडा गं, या देवाचा बाई।रात्री मजला स्वप्न पडले,मलूरायाचे दर्शन घडले,हाती झळके खड्ग खंडा गं, या देवाचा बाई।मुकुट शोभे शिरावरी,अर्धांगी म्हाळसा सुंदरी,झाला घोड्यावरती स्वार गं, देव पालीचा बाई।तनमनधन तुझ्या चरणी वाहिले,मज नाही देहभान राहिले,तुझ्या चरणी अर्पण केला गं, देह अमुचा बाई।सद्गुरु वाचूनी सापडेना सोयी,मज कळेना अनुभव काही,धोंडू पांडुभक्तीचा वेडा गं, चल सेवेला बाई।

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्रा