शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

प्रतिक्रिया टाळा आणि प्रतिसाद द्यायला शिका, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल! - गौर गोपाल दास

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 6, 2020 14:58 IST

एखादी गोष्ट पटत नसेल, तर क्षणभर थांबा, विचार करा. लक्ष परावर्तित करा, पण त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळा. त्यामुळे आपल्यालाच आपल्या विचारांवर विचार करण्याची संधी मिळते. बोलून झाल्यावर विचार करत बसण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

ज्योत्स्ना गाडगीळ 

सगळ्या वाईट गोष्टी माझ्याबरोबरच का घडत आहेत, हा विचार करण्यात आयुष्याचा बराच वेळ वाया जातो. त्यापेक्षा, माझ्याशी घडत असलेल्या गोष्टींना मी कसा प्रतिसाद देऊ, हा विचार केला, तर अडचणी, संधी बनून समोर येतील...सांगत आहेत, योगी गौर गोपाल दास.

आपल्या सर्वांनाच प्रतिक्रिया देण्याची फार घाई असते. काही जण तर पूर्ण ऐकून न घेताच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. परंतु, हीच सवय अंगवळणी पडते आणि कोणत्याही गोष्टीचे आकलन होण्याआधीच त्यावर मत नोंदवले जाते. मात्र, ही बाब अत्यंत बेजाबदारपणाची आहे. परिस्थिती लक्षात न घेता त्यावर भाष्य करणे चुकीचे ठरते. 

हेही वाचा : 'ड्रीम जॉब' वगैरे नसतो, मिळालेलं काम आवडीने करायला हवं! -ओशो 

एखादी गोष्ट पटत नसेल, तर क्षणभर थांबा, विचार करा. लक्ष परावर्तित करा, पण त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळा. त्यामुळे आपल्यालाच आपल्या विचारांवर विचार करण्याची संधी मिळते. बोलून झाल्यावर विचार करत बसण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. बोलून झाल्यावर, कृती घडून गेल्यावर सारवासारव करण्यात अर्थ नसतो. म्हणतात ना, बूँद से गयी, वह हौद से नही आती!

यशस्वी लोकांचे चरित्र वाचल्यावर लक्षात येईल, की ते प्रतिक्रिया देत नाहीत, तर प्रतिसाद देतात. या दोन्ही शब्दांत नेमका फरक काय, असे विचाराल तर एक उदा. पहा-

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर खेळत असताना लक्षावधी लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळून असतात. त्याक्षणी तो तटस्थ असतो. मन शांत ठेवतो. समोरून येणारा बॉल कसा असेल, हे त्याच्या हातात नसते, परंतु येणाऱ्या बॉलला कसा टोलवला, म्हणजे षटकार घेता येईल, याचे समीकरण त्याच्या मनात सुरू असते. त्या क्षणभरात त्याने घेतलेला निर्णय त्याला क्रिकेटचा देव बनवतो. कोट्यावधी लोकांकडून लोकप्रियता मिळवून देतो आणि मास्टर ब्लास्टर अशी उपाधी मिळवून देतो. हे यश एका रात्रीत मिळालेले नाही. तर यामध्ये त्या असंख्य क्षणांची मेहनत आहे, जी त्याला प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे घेऊन गेली. यासाठी आपला वैचारिक, आध्यात्मिक आणि मानसिक पाया पक्का असावा लागतो. 

आयुष्यात आपल्या मनाविरूद्ध असंख्य गोष्टी घडतात. त्या आपल्या नियंत्रणातही नसतात. त्याबद्दल त्रागा करून न घेता आपल्या नियंत्रणात काय आहे, त्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. शांत डोक्याने कृती केली पाहिजे. शांत चित्ताने विचार मांडले पाहिजे. या गोष्टींचा सराव आपल्याला प्रतिक्रिया टाळून प्रतिसाद द्यायला शिकवतो. ही सवय जडली, की आपण शांत राहतो आणि आपल्या सभोवतालचे वातावरण शांतपणे हाताळायला शिकतो. अशावेळी शांत कसे राहायचे, असे विचाराल, तर त्यावर उत्तर पुन्हा तेच... प्रतिक्रिया टाळा!

म्हणून आपल्या वाट्याला जे वाढून ठेवले आहे, त्या गोष्टींचा मनापासून स्वीकार करा. संकटातून संधी निर्माण करा. या सवयीमुळे संकटकाळातही तुम्ही न डगमगता धीरोदात्तपणे परिस्थितीचा सामना करू शकाल आणि सचिनप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल.

हेही वाचा : चला, आजीची सुई शोधुया

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर