शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

August Born Astro: कोणाच्या अध्यात ना मध्यात तरी लोकप्रिय जनात; पहा ऑगस्टमधल्या लोकांचे गुण-दोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:16 IST

August Born Astro: ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते ते वाचा आणि तुमच्या माहितीतले लोक तसेच आहेत का ते ताडून पहा.

ऑगस्टमध्ये जन्माला(August Born Astrology) आलेले लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांना विशेषत: सूर्याचे बळ मिळते. कारण या महिन्याचा गुरु सूर्य हा ग्रह असतो. त्यामुळे साहजिकच सूर्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रात सतेज कामगिरी करतात. ते उच्च जीवनशैली जगतात व मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात. त्याचबरोबर त्यांच्या ठायी असलेल्या नम्रतेमुळे ते आई वडिलांची सेवा, गरीबांना दानधर्म आवर्जून करतात. त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकता हे दोन गुण असतात. ते दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वत:च्या आनंदाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदात जाते. ते प्रत्येक नाते इमानदारीने निभावतात.

या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो. ते कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. आपले ध्येय गाठताना ते सत्याची कास सोडू देत नाहीत. स्वत: प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. अशा लोकांना स्वत:ची स्तुती ऐकायला आवडते. गंमत म्हणजे, कोणी यांची स्तुती केली नाही, तर ते स्वत:च आपली स्तुती करून मोकळे होतात.

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो. सूर्याचे जसे तेज त्यांच्या कार्याला मिळते, त्याचप्रमाणे सूर्याचा उग्रपणा थोडाफार त्यांच्या स्वभावात उतरतो. त्यामुळे रागाच्या भरात उलटसुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात. मात्र, हे लोक हिंसा, अत्याचार, फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाहीत.    

या लोकांना निरोगी आयुष्याचे वरदान असते. मध्यम बांधा, साधारण उंची, व्यक्तीमत्त्व रुबाबदार पण विरळ केस असे त्यांच्या रंगरुपाचे गणित असते. परंतु, मुळातच उच्च राहणीमानाची आवड असल्याने हे लोक आपल्या नैगुण्यावर सहज मात करतात आणि आपल्याला आणखी चांगले कसे राहता येईल, जगता येईल याचा विचार करतात व तशी मेहनत घेतात.

कमी मेहनत आणि जास्त परिणाम हे व्यस्त गुणोत्तर या लोकांच्या बाबतीत लागू होते. म्हणून सुरुवातीलाच यांना भाग्यवान असे म्हटले आहे. एवढेच काय, तर या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकते. तसेच नेतृत्त्वाचे गुण असल्यामुळे ते भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद चांगले निभावू शकतात. परंतु कधी कधी ते अविचाराने चांगल्या संधीला हुकतात व पश्चात्ताप करत बसतात. अशा बाबतीत त्यांचा थोडा संशयी स्वभाव आड येतो. तसेच दुसऱ्यांचे मत विचारण्यात कमीपणा वाटतो. या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात़

या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्ने लाभदायक ठरतात. तर पिवळा, केशरी आणि हिरवा हे रंग शुभ ठरतात. या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे. त्याचा त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो. सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य नमस्कार घालणे, गायत्री मंत्र म्हणणे यासारखे उपाय त्यांनी जरूर करावेत.

मदर तेरेसा, किशोर कुमार, राजीव गांधी, निर्मला सितारामन, श्रीदेवी, एनआर नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, गुलजार अशी नामांकित मंडळी ऑगस्ट महिन्यात जन्माला आली.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष