शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Astrology Tips: वाढते कर्ज, आर्थिक अडचणी, व्यवसायात नुकसान दूर करेल पावसाचे पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:44 IST

Astrology Tips: ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही कर्जबाजारी असाल किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर पावसाचे पाणी तुमच्या समस्यांवर मात करू शकते. कसे ते जाणून घ्या... 

भारतातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. या पाण्याची योग्य बचत केल्यास भविष्यातील पाणी प्रश्नांना सामोरे  लागणार नाही. पावसाचे पाणी केवळ पृथ्वीला नाही तर मनुष्याला आर्थिक अडचणीतूनही दिलासा देते. कर्जातून मुक्त होण्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ज्योतिषशास्त्रात पावसाच्या पाण्याबाबत अनेक विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. पावसाच्या पाण्याने वाढती कर्ज आणि आर्थिक संकटावर कशी मात करता येईल ते जाणून घेऊया.

व्यवसायात नुकसान टाळण्यासाठी - ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात नुकसान होत असेल तर पावसाचे पाणी पितळ्याच्या भांड्यात जमा करावे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी या पाण्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अभिषेक करावा. यामुळे व्यवसायात नुकसान होणे कमी होऊन प्रगती सुरु होईल. 

कर्जापासून मुक्ती - जर एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभावामुळे कर्जाचा बोजा वाढत असेल तर त्यांच्यासाठी पावसाचे पाणी खूप चमत्कारी ठरू शकते. हे पाणी एखाद्या कलशात साठवून हनुमानाला अर्पण करा. तसेच संपूर्ण श्रावण मासात हनुमान स्तोत्र म्हणून हा उपाय दर मंगळवारी किंवा शनिवारी करा. 

आर्थिक संकटातून सुटका - जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून बाहेर येत नसेल तर पावसाचे पाणी मातीच्या भांड्यात गोळा करून घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल.

पैशाची कमतरता दूर करण्यासाठी- ज्योतिषशास्त्रानुसार पैशाची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचे पाणी पातेल्यात जमवावे. ज्या सकाळी पाऊस नसेल आणि सूर्यदर्शन होईल त्यावेळी हे पाणी सूर्यप्रकाशात ठेवून, इष्टदेवतेचे नाव घेऊन घरात शिंपडावे. लक्ष्मी मातेची कृपा होईल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष