शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Astrology Tips: तुमच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे? घाबरू नका, 'हे' बिनखर्चिक उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:00 IST

Astrology Tips: काल सर्प योग असणे हा काही दोष नाही, त्याचे निवारण करणे सोपे आहे, त्याआधी त्याची तीव्रता किती हे जाणकारांकडून जाणून घ्यावे आणि दिलेले उपाय करावेत. 

>> ज्योतिषी सोनाली लिखितकर

काल सर्प योग असे नाव एखाद्या ज्योतिषाने किंवा गुरुजींनी काढले की समोरचा माणूस अगदी धास्तावून  जातो. पण हा काल सर्प योग म्हणजे काय याचीही नीट माहिती नसते . आता आपण प्रथम हा योग काय आहे हे पाहू या. जेव्हां कुंडलीत राहू आणि केतू या ग्रहांच्या  एकाच बाजूस सर्व ग्रह येतात त्याला कालसर्प योग  झाला असे म्हणतात . तर कधी कधी एखादाच ग्रह या राहू आणि केतूच्या मधे असतो .आणि बाकी सर्व दुसऱ्या बाजूस असतात .याला अर्ध काल सर्प योग म्हणतात . या दोन्हीलाही  काहीसे दोष कारक म्हणतात .परंतु नीट विचार केल्यास अशी स्थिती जितके दिवस असेल तेवढे दिवस जन्मणाऱ्या सर्व मुलांच्या कुंडलीत हा योग दिसेलच .पण खरे पाहता त्या सर्व मुलांना फार मोठ्या संकटातून जावे लागते असे काही नाही.  मग हा दोषकारक आहे हे कसे ओळखावे ??

काही लोकांना याचे विविध त्रास होतात१) घरामध्ये सतत भांडणे होणे२) सतत भीती वाटणे३)घरात अपंग अथवा व्यंगात्मक मूल जन्मास येणे .४) कर्ज , सतत पैसा खर्च होणे५) आत्महत्येचे विचार सतत मनात येणे .६) करणी ,बाधा , भूत पिशाच या प्रकारचे त्रास होणे .७) देवाधर्माच्या कार्यात रस न वाटणे. 

असे विविध प्रकारचे त्रास किंवा किमान २ ,३ प्रकारचे त्रास ज्यांना होतात .पण आता ज्यांच्या कुंडलीत हा असेल त्यांनी काय करायचे असा प्रश्न उभा राहतो . आता सर्वात महत्वाचे म्हणजे  जी १०, १२ लक्षणे दिली आहेत त्यापैकी काही  लक्षणे आपल्या स्वतःला आढळत असतील तर आपली पत्रिका तज्ञ ज्योतिषास दाखवावी. केवळ पूजा विधी करणारे किंवा साधे गुरुजी इत्यादी लोकांना दाखवू नये. जाणकारच हवा आणि त्यामध्ये जर आपली पत्रिका पूर्णपणे दोषकारक असेल तरच नारायण नागबली ,त्रिपिंडी श्राद्ध आणि कालसर्प शांती यापैकी एक किंवा तिन्ही उपाय तीव्रतेप्रमाणे करावेत . हे विधी नाशिक जवळील त्रंबकेश्वर किंवा दारीयाबाद येथील तक्षक तीर्थ यासारख्या ठिकाणी केले जातात पण आता एकंदर पाहता १०० कालसर्प योगाच्या कुंडल्यांचा अभ्यास केल्यास त्यातील केवळ २५ % कुंडल्याच बाधित असतात किंवा शापित असतात .बाकीच्या कुंडल्याना साधे उपाय करूनही भागते .त्यांना नारायण नागबली यासारखे  विधी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण  जर आपल्या पत्रिकेत काल सर्प योग दिसतोय पण त्याची लक्षणे फारशी जाणवत नसतील, तर खालील उपाय करून पाहण्यास हरकत नाही 

1)वडवानल स्तोत्राचा पाठ करणे . 2)बाधा असल्यास अंजन योग करणे3)हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र या सारख्या प्रभावी स्तोत्रांचे रोज किमान 7 पाठ करणे किमान 21 दिवस .4) सुंदरकांड चा पाठ करणे5) ध्यान धारणा ,मंत्र जप चालू ठेवणे 6) खोटे बोलणे , मत्सर , लबाडी ,स्वार्थीपणा यापासून लांब राहणे ,आणि अशा वागणाऱ्या लोकांपासून देखील दूर राहणे

संपर्क  9890447025 .

टॅग्स :Astrologyफलज्योतिष