शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

Astrology: राहूचे जाळे म्हणजे फसवणूक, नुकसान, घातपात; यातून बचावाचा मार्ग कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:04 IST

Astrology: सध्या सायबर गुन्हेगारीचा मोठा फटका बसत आहे, शिवाय फसवणुकीचे मार्गही वाढले आहेत, अशावेळी ज्योतिष शास्त्राने सांगितलेला सतर्कतेचा उपाय वाचा. 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या वाईट शक्तींचा वावर असतो आणि त्यातून आपले आयुष्य राजमार्गावर नेण्याचे काम करते ती आपली उपासना. म्हणूनच उपासनेची कास धरावी म्हणजे अनेक फसव्या आणि मोहात टाकणाऱ्या क्षणांपासून आपले संरक्षण होते.

गेल्या आठवड्यात ४ लोकांनी मला संपर्क केला . Fraud in Investment Apps.  मोठी गुंतवणूक केली आणि फसवणूक झाली. लक्ष्मी इतकी सहज नाही . कलियुगात राहू हर्शलचे  साम्राज्य आहे , त्यांच्या विळख्यात आपण अडकतो आणि अजून हवे अजून हवे अशी मनोधारणा होते, आपल्याही नकळत. कुठे थांबायचे ते समजत नाही. आपल्या मेंदूचा, मनाचा राहू इतका ताबा घेतो की आपल्याही नकळत आयुष्य भराची जमा पुंजी घालवून बसतो. 

Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

आज दोन लाखाचे चार लाख करून देतो वगैरे गोष्टी रोजच्याच आहेत. फसवणूक आता आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि म्हणूनच सतर्क राहिले पाहिजे. मुळात आपण कुठे गुंतवणूक करतो त्यासाठी चौकशी करणे ही तर प्राथमिक बाब आहे. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण पोस्टात पैसे टाका तिथे सुरक्षित राहतात असे माझे आई बाबा नेहमी सांगत. 

आज आपल्याला मोहात पाडणारी अनेक अँप, माध्यमे , गुंतवणूक करणारे अनेक प्लान आणि हे सर्व सांभाळणारी लोक आहेत. पण आपण सतर्क राहिलो तर आपण फसवणुकीपासून नक्कीच वाचू शकतो. आज समाजात वावरताना कान नाक डोळे उघडे ठेवायची गरज आहे. तसे केले नाही तर मग मनस्ताप करण्याची वेळ येते. 

Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते... 

मोहाचा एक क्षण आपले आयुष्य उध्वस्त करू शकतो . अशा वेळी काय ग्रहस्थिती असते ती पाहू. मोहात फसणे , कुणाच्या बोलण्याचा विचार न करता गुंतवणूक करणे म्हणजे कुठेतरी पत्रिकेत राहू कार्यरत झालेला आहे. राहूची दशा अंतर्दशा किंवा गोचर राहूचे धन स्थान, अष्टम व्यय किंवा धनेशावरून भ्रमण, मुळ पत्रिकेतील राहू वरून गोचर राहूचे भ्रमण , शनी मंगळा सारख्या पापग्रहांच्या वरून भ्रमण अशी स्थिती असू शकते. 

फसवणूक होते तेव्हा मुख्यतः अष्टम आणि व्यय भाव सामील असतात. अष्टमेश मनस्ताप, व्यय भाव हा एकंदरीत व्यय दर्शवते. प्रश्न कुंडली मांडली आणि चंद्र ८, १२ असेल तर संपलच सगळे. पैसे परत मिळणार नाहीत.

यासाठी जागृत राहा, कारण ह्या गोष्टी आता दिवसागणिक वाढतच जाणार आहेत. आपल्या सारख्या सुशिक्षित शिकलेल्या लोकांची फसवणूक होते हे आश्चर्य आहे. कारण पैशाची हाव, शेअर मार्केट हा भूलभुलय्या आहे. दोनाचे चार लाख होतात पण ते स्वप्नात! शेअर मार्केटचा परिपूर्ण अभ्यास असणारेही फसतात तर तुम्ही आम्ही काय ? इंटरनेट , ATM , GPAY ही सगळी राहुचीच भावंडे आहेत. GPAY काय आहे इथून पैसे तिथे जातात पण आपण बघतो का ते, अदृश्य शक्ती काम करतेय. त्यामागे विज्ञान आहे पण त्यातून होणारे फ्रॉडही जास्त आहेत. 

Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!

शेअर मार्केटमध्ये अनेक धनी झाले आहेत, पण त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास केला आहे. एका रात्रीत श्रीमंत झालेले नाही ते. सगळे झटपट हवे म्हणणाऱ्यांची मग अशीच अवस्था होते . गेल्या जन्माचे ऋण फेडायचे म्हणून बुद्धी होते तशी आणि मग जातात पैसे .

वेळीच सावध व्हा. आपल्या मुलांचे आपले भविष्य सुरक्षित करा. आज जिथे तिथे फसवणूक आहे, सतर्क राहा आणि इतरांनाही सतर्क करा. आपले अनुभव शेअर करा. गुंतवणूक करताना काळजी घ्या . म्हणूनच प्रत्येकाने आपली पत्रिका थोडीतरी समजून घेतली तर भविष्यातील संभाव्य धोके टाळता येतील. यासाठी सुरुवात उपासनेने आणि सावधान होण्यापासून करा!

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषcyber crimeसायबर क्राइम