शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

Astrology : व्यसनाधीन होण्यामागेही असू शकतो कुंडलीदोष; कसा ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 15:51 IST

Astrology: एखादी चांगली व्यक्ती एकाएक व्यसनाधीन होते, त्यामागे मानसिक, आर्थिक, सामाजिक कारणं असू शकतात, त्याबरोबरच कुंडली दोषही असू शकतो... 

>> सौ. अस्मिता दीक्षित (ज्योतिष अभ्यासक)

कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर करत राहणे , जिथे थांबायला पाहिजे तिथे न थांबता त्यात वाहवत जाणे वाईट आहेच . अति बोलणे , अति खरेदी करणे , फोनवर सतत बोलणे , खा खा खाणे , सतत टीव्ही पाहत राहणे हेही काही प्रमाणात व्यसनच म्हंटले पाहिजे . अति मद्य घेणारी  व्यक्ती सुद्धा आपले आणि आपल्या कुटुंबाचे सुद्धा नुकसान करते . समाजात न मिळणारा मान सन्मान , आप्तेष्ठ , मित्र जवळचे लोक ह्यांच्याकडून मिळणारी घृणास्पद, अपमानास्पद  वागणूक त्यांना अजून ह्या नरकात लोटत राहते. आज ह्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करुया.

कुठलाही माणूस जन्मतः वाईट वागत नाही किंवा व्यसने करणार नाही. पण आयुष्य जसजसे पुढे जाते तसे असे काही प्रसंग किंवा परिस्थिती समोर उभी राहते ज्याचा सामना तो करू शकत नाही आणि परिणाम म्हणजे मनुष्य स्वतःच्या मनावरचा ताबा सोडून व्यसनात गुरफटत जातो. पण व्यक्ती व्यसनाकडे का वळली? ह्या प्रश्नाच्या मुळाशी जातो का? नाही . आजकाल मद्य न पिणे म्हणजे जवळजवळ मागासवर्गीय असाच काहीसा अर्थ घेतला जातो . पार्टी आणि मद्य हे जणू समीकरण झाले आहे . 

अनेकदा स्वतःच्याच घरात वडील मंडळी व्यसनाधीन असतात म्हणून व्यसन हा मार्ग अनुकरण म्हणून स्वीकारला जातो , अनेकदा योग्य वयात हवे ते शिक्षण मग आपल्यात क्षमता उत्तम गुण असूनही चांगल्या नोकरीची किंवा परदेशी जाण्याची संधी न मिळणे , हवा तसा जोडीदार न  मिळणे किंवा प्रेम प्रकरणात मिळालेले अपयश , नोकरीत वरिष्ठांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक , व्यावसायिक अपयश , जवळच्या व्यक्तींचा सहन न होणारा दुरावा , निराशा , वैफल्य अशी अनेक अनेक कारणे व्यसनात झोकून देण्यास कारणीभूत ठरतात . प्रेमभंग , मातृपितृ छत्र हरवणे , एखाद्याकडून झालेली अवहेलना , मानसिक आर्थिक कुचंबणा अश्या अनेक गोष्टी सुद्धा विचारात घ्याव्या लागतात . आजकालच्या कॉर्पोरेट युगात कार्यालयात होणारे अंतर्गत राजकारण , जीवघेणी स्पर्धा , अनेकदा त्यात टिकण्यासाठी मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या तडजोडी मनावर दडपण आणतात आणि मग त्या निराशेत व्यसनाकडे आपण कधी वळलो ते त्या व्यक्तीला सुद्धा समजत नाही . कुठलेही व्यसन हा काही कायमस्वरूपी आपल्या समस्येसाठीचा तोडगा नाही. ते क्षणिक असते . उलट ह्यामुळे जोडीला नवीन आजारपणे येतात आणि पैशाचा अपव्यय होतो ते वेगळेच . 

ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून व्यसन लागण्याच्या काय ग्रहस्थिती असू शकेल ह्यावर प्रकाश टाकण्यासाठी हा लेखन प्रपंच. एखादी व्यक्ती व्यसनाकडे वळते तेव्हा सर्वात महत्वाचे कारण हेच असते कि तिच्या आयुष्यातील जी कुठली समस्या किंवा परिस्थिती आहे ती तिला हाताळता येत नाही आहे किंवा ती क्षमता ती हरवून बसली आहे.  ह्याचे मुख्य आणि एकमेव कारण मनाचा कारक ग्रह “ चंद्र “ पत्रिकेत बिघडला आहे . मन हे संवेदनशील आहे . मनाचा समतोल ज्याला राखता आला तो जिंकला. काही व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतात , त्यांना मान अपमान सहन होत नाही मग त्या स्वतःचे अस्तित्व हरवून बसण्यासाठी नशेचा आधार घेतात. कमकुवत मनाची माणसे व्यसनाचा आधार घेतील तर खंबीर मनाची माणसे परिस्थितीशी दोन हात करतील, मार्ग काढतील. 

पत्रिकेतील कमकुवत, बलहीन चंद्र व्यसनाकडे झुकवतील आणि त्यात चंद्राशी शनीचा संबंध असेल तर दीर्घकाळ ह्यातून व्यक्ती बाहेर येवू शकणार नाही . राहू सुद्धा व्यसनाला भयंकर प्रोत्साहन देणारा ग्रह आहे. राहू हा धुवा असल्यामुळे लहान सहान व्यसने करता व्यक्ती ड्रग्स चा शिकार कधी होतो समजत नाही. राहूमुळे सगळ्यात लवकर बिघडणारा चंद्रानंतरचा ग्रह म्हणजे बुध . बुधाची रास निसर्ग कुंडलीत तृतीय भावात येते  जिथे आपले हात आहेत . शाळा कॉलेज मधील मुलांना व्यसने लागली कि ती करायला पैसे लागतात . अश्यावेळी बिघडलेले चंद्र बुध आणि राहू त्यांना चोरी करायला सुद्धा प्रवृत्त करतात . घरात चोरी करून आपली नशेची सोय करण्यात हि मुले मग्न असतात . आपण काय करत असतो आणि ह्या चुका आपल्याला किती महाग पडणार आहेत ह्याची कल्पना करण्याची मानसिक क्षमताच ते हरवून बसलेले असतात . चांगले वाईट कळण्याच्या पार पलीकडे गेलेले आणि स्वतःच्याच विश्वात रमलेले असतात . जलतत्वाच्या राशी मध्ये चंद्र शनी राहू शुक्र हे ग्रह असतील तर व्यसने लवकर लागू शकतात . सारासार विचार करण्याची क्षमता हरवून बसलेली व्यक्ती ह्या व्यसनांची शिकार होते . 

बुद्धीचा कारक बुध आणि नीति , संस्कारांचा कारक गुरु जर पत्रिकेत उत्तम असतील तर व्यक्ती व्यसनांपासून दूर राहील . व्यसन जरी लागले तरी हे दोन ग्रह पत्रिकेत चांगले असतील तर लागलेले व्यसन सुटण्यास मदत होते . शुक्र हा ग्रह भौतिक सुख ,  प्लेजर देणारा ग्रह असल्यामुळे असे लोक मौजमजेसाठी अंमली पदार्थांचे सेवन पार्टी मध्ये करतील  पण व्यसनाधीन होत नाहीत . आजकाल तंबाखू , गुटखा खाण्याऱ्या लोकांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. ह्या सवयी पत्रिकेत गुरु कमजोर असल्याने लागतात आणि कमी होत नाहीत.

दारूचे व्यसन किंवा गुटखा , चरस कुठलेही व्यसन असुदे . ह्या व्यक्ती आपल्या समाजाचा भाग आहेत , त्यांनाहि त्यांचे कुटुंब मुलेबाळे आहेत . त्यात आपलेही जवळचे कुणी असू शकतात . एखादी गोष्ट मानसिक दृष्टीने पेलवली नाही म्हणून निराश होवून अश्या व्यक्ती व्यसनात अडकलेल्या आहेत . समाजाचे एक घटक म्हणून त्यांना ह्यातून बाहेर काढून पुन्हा एकदा नव्याने जीवनाची सुरवात करून देण्यासाठी लागणारा आत्मविश्वास त्यांना कसा मिळले ह्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायला पाहिजेत . 

त्यांना व्यसनी म्हणून हिणवण्यापेक्षा त्यांना मदतीचा हात देऊन ह्यातून बाहेर काढले तर समाजाच्या ऋणातून आपण मुक्त होऊ आणि एक आत्मिक समाधान सुद्धा मिळेल आपल्याला. आज अनेक संस्था ह्या व्यक्तींसाठी कार्यरत आहेत पण ह्या मुठभर संस्था पुरेश्या नाहीत . आजकालच्या प्रगत काळात खोर्याने पैसा , अनेक सुख सोयीनी सज्ज घरे सर्व काही आहे पण व्यसनाधीन होताना आपली तरुण पिढी आपण बघत आहोत . आता हातावर हात धरून नुसते बसून तटस्थ राहून बघणे आपल्याला परवडणारे नाही . अश्या लोकांचे मित्र होवून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांना गेलेली उमेद परत मिळवून देता आली तर ह्या व्यक्ती नक्कीच ह्यातून बाहेर पडतील. 

आयुष्यात संघर्ष आहे , प्रत्येकाच्या जीवनात आहे तो कुणालाही चुकलेला नाही पण त्यातून पळ काढून व्यसनांच्या आहारी जाणे हा त्यावर उपाय नाही. आपले मन घट्ट करून आहे त्या परिस्थितीशी दोन हात करणे त्याला धीराने सामोरे गेलो तर व्यसनांचा आधार लागणारच नाही. आपणच एकमेकांचा आधार बनले पाहिजे. अश्या सेवाभावी संस्थातून आपण काही वेळ दिला पाहिजे. अश्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा नव्याने जगण्याची उमेद दिली पाहिजे . 

कुणीही व्यक्ती स्वतःच्या मर्जीने राजीखुशीने व्यसनाधीन होत नसते . व्यसन जन्मतःच नसते हे तर मान्य आहे ना ? परिस्थितीमुळे माणूस त्या गर्तेत अडकतो , अनेकदा बाहेर यायचेही असते पण प्रयत्न करून ते साध्य होत नाही . अश्यावेळी जवळच्या लोकांकडेच तो आधारासाठी पाहतो , अश्यावेळी त्याला योग्य मार्गदर्शन , औषधोपचार आणि मानसिक आधार मिळाला तर व्यक्ती ह्यातून नक्कीच बाहेर येयील. आज अनेक व्यसनमुक्ती केंद्र ह्यासाठी कार्यरत आहेत .

संपर्क : 8014639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिष