शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: शनि दोष आणि आर्थिक समस्यांमधून मुक्ति मिळवण्यासाठी मिरीचा करा 'असा' उपयोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 07:00 IST

Astro Tips: आहारात मिरीचा जसा मोठ्या प्रमाणात वापर होतो, तसा ज्योतिष शास्त्रातही मिरीचा तोडग्यांसाठी वापर कसा केला आहे ते पहा!

एखादी व्यक्ती तापदायक ठरत असेल तर तिला उद्देशून आपण 'डोक्यावर मिरे वाटते' अशी म्हण मनातल्या मनात वापरतो. पण असे अनेक लोक जेव्हा डोक्यावर मिरे वाटू लागतात किंवा आपल्या चांगल्या चाललेल्या कामात अडथळे निर्माण करू लागतात त्यांच्यावर मिऱ्याचा प्रयोग प्रभावी ठरतो असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. हे म्हणजे काट्याने काटा काढण्यासारखेच झाले, नाही का?  त्यासाठी पुढे दिलेले उपाय जरूर करून बघा. 

खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे. ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की अनेक वेळा नशीब साथ देत नसल्याने अशा समस्या उद्भवतात, ज्यावर काही खास उपाय करून मात करता येते. असे काही उपाय पुढे देत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही जीवनात यश मिळवू शकता. 

अपूर्ण व्यवसाय पूर्ण करण्यासाठी

मोऱ्यांचा समावेश खड्या मसाल्यांमध्ये केला जातो. आयुर्वेद आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहेच, शिवाय ज्योतिष शास्त्रानेही त्याचे महत्त्व ओळखून त्याचा वापर करून घेतला आहे. काळ्या मिऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघताना ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असतील तर घराच्या प्रमुख दारात पाच-सहा मिरे ठेवा आणि निघताना त्याला पाय टेकवून पुढे जा. काम करून घरी आल्यावर ते मिरे पुडीत बांधून आडवाटेच्या झाडाशी टाकून द्या. तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतील. 

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी

ज्या लोकांच्या कुंडलीत शनि दोष आहे किंवा साडेसातीचा त्रास सुरू आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकीट एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा शनि मंदिरात ठेवावे. असे केल्याने कुंडलीतील शनि दोष निघून जातो असे म्हणतात.

दीर्घकाळाच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून 

एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा बारा मिरे छोट्या पुडीत बांधून दक्षिण दिशेला फेकून यावेत. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. त्या दिशेने संकटं संपुष्टात यावी यासाठी हा उपाय सांगितला जातो. त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हेही सांगितले जाते. 

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी

आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुडीत काळी मिरीचे काही दाणे बांधून ती पुडी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जाऊन आपली आर्थिक अडचण सांगा व नंतर ती पुडी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवा. फरक दिसू लागेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष