शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Astro Tips: नोकरी करावी की बिझनेस? या पेचात असाल तर करा 'हा' २० सेकंदाचा ज्योतिष शास्त्रीय प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:40 IST

Astro TIps: नोकरी करणाऱ्या माणसाला व्यावसायिक व्हावेसे वाटते, पण व्यवसाय चालेल का ही भीतीही मनात असते; त्यासाठी हा ज्योतिष शास्त्रीय तोडगा!

आपल्या साचेबद्ध शिक्षण पद्धतीमुळे शिक्षण, नोकरी, लग्न, निवृत्ती हा संस्कार आपल्या मनावर बालपणापासून केला जातो. त्यामुळे व्यवसाय करावा हा विचारही मनाला शिवत नाही. मात्र मोठेपणी नोकरी सुरु झाली, कुणी बॉसिंग करू लागले, सहकर्मचारी त्रास देऊ लागले की आपल्यातला व्यावसायिक जागा होतो. पण मानसिक, वैचारिक, आर्थिक आणि शारीरिक तयारी नसल्यामुळे अशी झेप घेणे सगळ्यांनाच जमते असे नाही आणि जे जमवतात त्यांना टिकवता येतेच असे नाही. कारण, नोकरीत कामाचे तास ठरलेले असतात, मात्र व्यवसाय चोवीस तास सुरु असतो. त्यात झोकून देण्याची तयारी ठेवावी लागते, आर्थिक गणिते बसवावी लागतात, नुकसान झाल्यास पुन्हा उभे राहण्याची तयारी ठेवावी लागते आणि दर दिवशी नवनवीन समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यवसायात पैसा दिसत असला तरी त्यामागे करावे लागणारे अपार कष्ट जाणून घ्यावे लागतात. 

मात्र, सगळी तयारी दाखवूनही एक प्रश्न उरतोच, आपल्याला व्यवसाय जमेल का?लोक आपल्याकडे येतील का? आपला व्यवसाय वाढेल का? या प्रश्नांवर उत्तर म्हणून ज्योतिष शास्त्रात एक छोटासा प्रयोग सांगितला आहे, तो जरूर करून बघा!

२० सेकंदाचा प्रयोग :

>> एखाद्या दिवशी मधल्या वेळेत कोणत्याही दुकानात जा. जिथे फारशी गर्दी नसेल. >> त्या दुकानात काहीही खरेदी करू नका, फक्त न्याहाळणी करा. >> २० सेकंद दुकानात थांबा. >> जर तेवढ्या वेळात आणखी दोन-पाच किंवा पाच-दहा माणसं दुकानात आली तर समजून जा, तुमचा ऑरा अर्थात तुमचे वलय अतिशय प्रभावी आहे! तुम्ही व्यवसायात स्वतःला आजमावू शकता. 

कसा लावावा निष्कर्ष : 

>> काही लोक लोहचुंबकासारखे असतात. ते जिथे जातात त्यांच्या अवती भोवती लोक गोळा व्हायला सुरुवात होते. >> हा केवळ स्वभाव गुणधर्म नाही तर व्यक्तिमत्त्वातही चुंबकीय शक्ती असते, ज्यामुळे जमाव तयार होतो. >> हे केवळ मित्र परिवार किंवा नातेवाईकांमध्ये नाही तर अनोळखी ठिकाणीही प्रत्ययास येते. >> हा अनुभव या आधी तुम्ही घेतला असेल किंवा यापुढे घेणार असाल तर २० सेकंदाचा प्रयोग जरूर करा. तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल. 

व्यवसाय सुरु करताना :

>> हा ज्योतिष शास्त्रीय प्रयोग तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करेल, मात्र नोकरी सोडून व्यवसायात उडी घेताना टप्प्याटप्प्याने प्रवास करा. >> सर्कशीत एका दोरावरून दुसऱ्या दोरावर लटकून जाणारी मुलगी ज्याप्रमाणे दुसरा दोर हाती आल्याशिवाय पहिला सोडत नाही, त्याप्रमाणे आपणही व्यवसायात पार्ट टाइम उतरून स्वतःला आजमावून पाहावे. >> नोकरी असो वा व्यवसाय, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तिथल्या खाच खळग्यांची जाणीव होत नाही. 

त्यामुळे व्यवसाय जरूर करा, त्याआधी स्वतःला वर दिलेल्या पद्धतीनेही आजमावून बघा!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष