हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवीची विधिवत पूजा, उपासना केल्यास घरात सुख-शांती आणि आर्थिक स्थिरता येते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवारच्या दिवशी कापराचे काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. जर तुमच्या जीवनात सतत समस्या येत असतील, कामांमध्ये अडथळे येत असतील किंवा पैशाची कमतरता भासत असेल, तर शुक्रवारी कापराचे हे उपाय (Shukravar Che Upay) नक्की करून पाहा.
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
१. घरात सुख-शांती आणि समृद्धीसाठी उपाय
घरात सतत होणारे वादविवाद, तणाव आणि नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी कापराचा उपाय अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी, माता लक्ष्मीची पूजा करताना तुपात भिजवलेला एक कापूर अवश्य जाळावा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, वातावरण सकारात्मक (Positive) राहते आणि कुटुंबात सुख-शांती व समृद्धी कायम राहते. कापराच्या सुगंधाने साधकाचे मनही शांत होते आणि तणाव कमी होतो.
२. कार्यसिद्धी आणि अडथळे दूर करण्यासाठी उपाय
नोकरी, व्यवसाय किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, तर हा उपाय खूप फायदेशीर आहे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. एका लाल रंगाच्या स्वच्छ वस्त्रात, दोन जास्वंदीची फुले आणि दोन कापराच्या वड्या बांधा. ही पुडी देवघरात माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि विधीपूर्वक पूजा-आरती करा. संध्याकाळी पुन्हा पूजा केल्यानंतर, ही पुडी उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. तुम्ही ती आपल्या कार्यस्थळाच्या ड्रॉवरमध्येही ठेवू शकता. या उपायाने सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात.
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
३. धनप्राप्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी उपाय
पैशाची समस्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय करून पाहा. शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करा.आरती करताना कापराचा उपयोग नक्की करा. आरतीनंतर "ॐ ह्रीं श्रीं लक्ष्म्यै नमः" या मंत्राचा कमीतकमी १०८ वेळा जप करा. कापूरआरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, ज्यामुळे घरात स्थिरता येते.
४. नजर दोष दूर करण्यासाठी उपाय
वारंवार दृष्ट लागत असल्यास किंवा बनलेली कामे बिघडत असल्यास, हा उपाय उपयोगी आहे. एक कपूर आणि ७ लवंगा घ्या. आपल्या किंवा ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे असे वाटते, त्याच्यावरून सात वेळा उतरवा. आता कापूर आणि लवंगा मातीच्या भांड्यात किंवा दिव्यामध्ये ठेवून जाळून टाका. त्याची रक्षा/ राख वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय केल्याने नजर दोष दूर होऊन जीवनात सकारात्मकता येते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
टीप: ज्योतिष आणि धार्मिक मान्यतांवर आधारित हे उपाय केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. कोणत्याही उपायाचा परिणाम तुमच्या श्रद्धेवर आणि प्रयत्नांवर अवलंबून असतो.
Web Summary : Perform camphor remedies on Fridays for Lakshmi's blessings. Burn camphor with ghee for peace. Tie camphor and jasmine in red cloth for success. Chant Lakshmi mantra during camphor Aarti for wealth. Burn camphor and cloves to remove evil eye.
Web Summary : लक्ष्मी के आशीर्वाद के लिए शुक्रवार को कपूर के उपाय करें। शांति के लिए घी के साथ कपूर जलाएं। सफलता के लिए लाल कपड़े में कपूर और चमेली बांधें। धन के लिए कपूर आरती के दौरान लक्ष्मी मंत्र का जाप करें। बुरी नजर दूर करने के लिए कपूर और लौंग जलाएं।