सुख दुःख हा आयुष्याचा भाग आहे. मात्र काही लोकांच्या आयुष्यात दुःख, संकटं, आजारपण संपण्याचे नावच घेत नाहीत. त्यामागे इतरही कारणे असतात. मात्र त्यातून सुटका करणारा मार्ग प्रत्येक जण शोधत असतो. ज्योतिष शास्त्रात त्यादृष्टीनेच सोमवारी करायचे तोडगे सांगितले आहे. देवाधिदेव महादेव यांना आशुतोष असेही म्हटले जाते, कारण ते लवकर संतुष्ट होतात. दिलेले तोडगे केले असता त्यांची कृपा प्राप्त होण्यास लवकर मदत होते. त्याबद्दल जाणून घेऊ.
लवंग :
सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याचा अभिषेक करा. यानंतर, तुमच्या हातात दोन लवंगा ठेवा आणि तुमचे दुःख, अडचणी देवाला सांगा आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा म्हणून प्रार्थना करा. त्यानंतर नमस्कार करून त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील आणि अडचणीतून मार्ग निघेल.
दोष दूर करण्याचे मार्ग :
जर एखाद्या व्यक्तीच्या समस्या सुटत नसतील आणि आर्थिक नुकसान होत असेल तर ती व्यक्ती शनि दोषाने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी दर सोमवारी शिवलिंगाची पूजा करून त्यावर पाण्याचा अभिषेक करावा आणि काळे तीळ अर्पण करावेत. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटना, नकारात्मक ऊर्जा काळ्या तिळाच्या रूपात शिव शंकराच्या पायी अर्पण केल्याने ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
इच्छा पूर्तीचे उपाय :
सोमवारी, शिवशंभोला पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून, हातात दोन लवंगा, पाच सुपारी आणि पाच नागवेलीची पाने घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा. ती पाने श्रद्धेने डोळ्यांना लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा. सलग ४ सोमवार हा उपाय केल्याने कामाच्या मार्गातील मुख्य अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल.