शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

Astro Tips: सकाळी उठल्याबरोबर करा 'या' ५ गोष्टी; मिळेल धन, आरोग्य आणि सुख-समृद्धी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 07:00 IST

Astro Tips: रोज सकाळी उठून पुढे दिलेल्या ५ गोष्टी केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, तसेच पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात. ही कामे अगदी सोपी आहेत, जी कोणीही करू शकतात. कोणती ते जाणून घ्या!

हिंदू धर्मात अनेक रूढी, परंपरा आहेत. ज्या आपल्या संस्काराचा भाग आहे. बदलत्या काळानुसार यातील अनेक गोष्टी लोप पावत आहेत. मात्र या गोष्टी आपल्या पूर्वजांच्या दिनचर्येचा भाग होत्या. त्या गोष्टींचे नियमित पालन केले असता संपूर्ण दिवस चांगला जातो आणि त्याचे चांगले परिणामही मिळतात अशी त्यांची श्रद्धा होती व अनुभवही होता. ती मुख्य पाच कामे कोणती ते जाणून घेऊया. 

रोज सकाळी हाताचे तळवे पहादररोज सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावर उठून बसल्यावर सर्व प्रथम आपले दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत आणि नंतर ते पुस्तकासारखे उघडावेत. त्यानंतर तळव्याकडे बघत पुढील श्लोक म्हणावा-कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।कर मूले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम्॥अर्थ- (माझ्या) हाताच्या समोर लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागात ब्रह्मदेवाचा वास आहे. रोज सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने सुख-समृद्धीबरोबरच ऐश्वर्यही प्राप्त होते.

देवाला प्रार्थना करासकाळी उठून आदल्या दिवशी आपल्या हातून घडलेल्या चुकांसाठी क्षमा मागा आणि तुमचा आजचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना देखील करा. आयुष्यात येणाऱ्या अडचणीतून मार्ग दाखवण्याची विनंती करा. अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना केल्याने तुमचे जीवन सुखी राहते आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो. 

धरणी मातेला नमस्कार रोज सकाळी उठल्यावर धरणी मातेला नमस्कार करा, कारण धार्मिक ग्रंथांमध्ये पृथ्वीला पूजनीय आणि देवी तसेच माता स्वरूप म्हटले आहे. तिच्यावर पाय ठेवण्यापूर्वी नतमस्तक होऊन तिची क्षमा मागा आणि आमचा सांभाळ कर अशी प्रार्थना करा-समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले। विष्णुपंत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥अर्थ- हे समुद्र आणि पर्वतांच्या देवी, भगवान विष्णूच्या पत्नी, मी तुला नमन करतो. तू माझ्या सर्व पापांचे क्षालन कर. 

पाणी प्या :सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या. शक्य असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर ते प्या. याचे 2 फायदे होतील, एक, तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि दुसरे, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने सूर्याशी संबंधित दोषही दूर होतील आणि तुम्हाला जीवनात मान-सन्मान मिळेल.

शुभ चिन्ह पहा : दररोज सकाळी उठल्यावर, आपल्या आवडत्या देवतेचे चित्र पहा. याशिवाय तुळशी, स्वस्तिक, लक्ष्मीचे पदचिन्ह, कमळ, शंख यापैकी काही नजरेसमोर ठेवता आले तरी उत्तम! या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष