शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: कुबेर महाराजांची मूर्ती किंवा कुबेर प्रतिमा तुमच्या घरावर करेल धनवर्षाव; ज्योतिष शास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:50 IST

Astro Tips घरात पैसा येतो पण टिकत नाही,अशी तुमचीही अडचण असेल तर ज्योतिष शास्त्राने सांगितलेला 'हा' उपाय नक्की करा.  :

कुबेराची मूर्ती किंवा कुबेर प्रतिमा तुमच्या घरावर करेल धनवर्षाव; ज्योतिष शास्त्र सांगते... सगळी सोंगं घेता येतात, पण पैशांचं सोंग घेता येत नाही, असे म्हणतात आणि ते खरे आहे. कारण, जवळपास सगळ्याच विषयांचे, वादाचे मूळ पैसा हेच असते. तो कमी असला तरी ताप आणि जास्त असला तरी ताप! म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' अर्थात चांगल्या मार्गाने येणारा आणि पोटाला पुरेल एवढाच धनसंचय करा, म्हणजे निश्चिन्तपणे जगू शकाल, असे महाराजांना सुचवायचे आहे. पण, काही जणांची समस्या वेगळीच असते. ती म्हणजे पुरेसा पैसा घरात येतो, पण टिकत नाही आणि जो आहे तो वाढतही नाही. याबाबत ज्योतिष शास्त्राने दिलेला तोडगा अवश्य करावा. 

वित्तप्राप्तीसाठी आपण जशी लक्ष्मी मातेची पूजा करतो, तशीच धनाची देवता कुबेर यांचीही पूजा करतो. कुबेर महाराज हे कल्याणकारी आहेत. आपल्या घरात आर्थिक समस्यां असतील तर कुबेर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे असे ज्योतिष शास्त्र सांगते. तसेच घरात कुबेर मूर्ती ठेवणेही लाभदायी ठरते. परंतु या गोष्टींची जागासुद्धा ज्योतिष शास्त्र तसेच वास्तुशास्त्र यांच्या नियमानुसार निवडली तर अधिक लाभ होतो. 

ज्योतिष शास्त्रानुसार कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. त्यांची प्रतिमा घराच्या उत्तर दिशेला लावली तर घरातील पैशांचा संग्रह कायम राहतो. अतिरिक्त पैसा खर्च होत नाही तसेच पैशांचा अपव्यय होत नाही. परंतु आवक वाढवायची असेल तर ज्योतिष शास्त्राने कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा घराच्या पश्चिम दिशेला लावली तर घरात येणारा पैसा दुप्पट होण्यास मदत मिळते. अर्थातच उत्पन्नाची साधने वाढतात. आवक वाढते आणि घरात पैशांचे प्रमाण वाढते. 

पश्चिम दिशा ही येणाऱ्या गोष्टी द्विगुणित करणारी दिशा मानली जाते. म्हणून या दिशेने उभे राहिले असता, नकारात्मक विचार करू नये, अन्यथा नकारात्मकता देखील दुप्पट होईल. म्हणून आपल्या वास्तूमध्ये कायम चांगल्या विचारांची देवाण घेवाण कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. 

याबोरबरच कुबेर महाराजांचा एक मंत्र रोज सायंकाळी १०८ वेळा म्हणावा, त्यामुळेदेखील कुबेर महाराजांची कृपा आपल्यावर राहते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. तो मंत्र पुढीलप्रमाणे -

ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥

हा मंत्र म्हणण्यापूर्वी अंघोळ करून किंवा हात पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा यासमोर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. जप माळ घेऊन वरील जप श्रद्धापूर्वक करावा, त्यामुळे निश्चितच लाभ होतो, असे ज्योतिष जाणकार सांगतात. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष