शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Astro Tip: सकाळी झोपून उठल्यावर म्हणा 'हा' पॉवरफुल मंत्र; २१ दिवसात मार्गी लागेल काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:13 IST

Astro Tips: मंत्रांमध्ये खूप ताकद असते, मनोभावे जप केला तर त्याचा परिणाम दिसतो; इथे दिलेला मंत्र किती वेळेला करावा याचे बंधन नाही तरी लाभ होणार!

मंगळवार, शनिवार हा हनुमंताच्या उपासनेचा. याचा अर्थ इतर दिवशी त्याची उपासना करायची नाही का? तर असे नाही! प्रत्येक देवतेचा वार ठरवून देण्यामागचे कारण म्हणजे त्या त्या दिवशी त्या देवाची आठवण काढून त्यांचे स्मरण, पूजन करावे. काही उपासना दैनंदिन स्वरूपाच्या असतात. जसे की सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे पाहून लक्ष्मी, विष्णू, सरस्वती यांचे स्मरण करत, 

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥

हा श्लोक म्हणावा. त्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला स्पर्श करून नमस्कार करत, 

समुद्रवसने देवी पर्वतस्थानमंडले ।विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥

असे म्हणत तिची क्षमा मागावी. त्यानंतर अंघोळ करताना गंगेचे स्मरण, अंघोळ झाल्यावर अथर्वशीर्ष, भगवद्गीतेचे अध्याय, संध्याकाळी रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणावे आणि रात्री झोपण्याआधी, 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥

हा श्लोक म्हणत श्रीकृष्णाला अनन्य भावे शरण जात आपला दिवसभराचा थकवा, तणाव, तक्रारी त्याच्या पायाशी अर्पण करून आपला योगक्षेम त्याने चालवावा अशी विनंती करावी आणि झोपी जावे. 

Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!

याबरोबरच आणखी एक मंत्र महत्त्वाचा .... 

संत तुलसीदास यांनी रचलेली 'हनुमान चालीसा' रोज म्हणत असाल तर उत्तमच आहे. पण सकाळी झोपून उठल्यावर दिवसभरातली कामं सुरु करण्याआधी अंथरुणावर बसूनच 'ओम हनुमतये नमः' हा मंत्र जितक्या वेळा शक्य तितक्या वेळा म्हणावा. त्यासाठी हातात जपमाळ घेण्याची गरज नाही. केवळ मनापासून हा मंत्र म्हणणे अपेक्षित आहे. या मंत्राची ताकद अशी की हनुमंताला आपले गाऱ्हाणे एकवेच लागते. त्यासाठी हाक मनापासून मारावी लागते हेही तेवढेच खरे आहे. 

Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

२१ दिवसांत परिणाम : 

हा मंत्र सलग २१ दिवस  सकाळी झोपून उठल्यावर आठवणीने म्हटला तर तुम्हाला तुमच्या अडचणीतून नक्कीच मार्ग सापडेल. यासाठी झोपून उठल्यावर हा नामजप मनातल्या मनात सुरु करा. 

(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष