शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:36 IST

Astro Tip: अपयश येताच उठसूट आपण नशिबाला दोष देतो, पण ग्रहदशा कशामुळे बिघडते हे जाणून घेतले तर चुका सुधारता येतील आणि ग्रहदोष दूर करता येईल. 

ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. अनेकदा आपण नशिबाला दोष देतो, पण वास्तवात आपल्या दैनंदिन सवयी, वागणूक आणि आपले 'कर्म' आपल्या ग्रहांच्या शुभ किंवा अशुभ फळांना कारणीभूत असतात. कसे ते जाणून घेऊ. 

हे ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे असते समोरच्याचं मन वाचण्याची दैवी शक्ती!

कुंडलीत ग्रहदशा खराब होण्यामागे केवळ ग्रहांची चाल नसते, तर आपल्या काही विशिष्ट सवयीही त्याला खतपाणी घालत असतात. चला तर मग, जाणून घेऊया नऊ ग्रहांच्या नुकसानीला कारणीभूत ठरणारे आपले वर्तन:

१. सूर्य (Sun): स्वाभिमान की अहंकार?

सूर्य हा आत्म्याचा आणि पित्याचा कारक आहे. जेव्हा तुम्ही उशिरापर्यंत झोपता, वडिलांचा अपमान करता किंवा तुमच्यात अहंकार (Ego) वाढतो, तेव्हा सूर्याचे शुभ फळ मिळणे बंद होते. यामुळे समाजात मान-सन्मान कमी होतो.

२. चंद्रमा (Moon): मन आणि आईचा सन्मान

चंद्र हा मनाचा आणि पाण्याचा कारक आहे. पाण्याचा अपव्यय करणे आणि आई किंवा आईसमान स्त्रियांचा अनादर करणे यामुळे चंद्र खराब होतो. याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक शांतीवर होतो.

३. मंगल (Mars): ऊर्जा आणि शिस्त

मंगळ हा पराक्रमाचा ग्रह आहे. अतिराग, वारंवार होणारी भांडणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कराची (Tax) चोरी करणे, घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणे, फसवणूक करणे, यामुळे मंगळ अशुभ फळ देऊ लागतो. यामुळे कोर्ट-कचेरी आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

हे ही वाचा : Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच!

४. बुध (Mercury): वाणीचा प्रभाव

बुध हा बुद्धी आणि वाणीचा कारक आहे. शिवराळ किंवा निंदनीय शब्दांचा वापर करणे आणि विनाकारण बढाया मारणे (निरर्थक बडबड) यामुळे बुध खराब होतो. याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर आणि संवादावर होतो.

५. गुरु (Jupiter): ज्ञान आणि आदर

गुरु हा ज्ञानाचा सागर आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा अभिमान होतो किंवा तुम्ही मोठ्या माणसांचा अपमान करता, तेव्हा गुरु ग्रह कोपतो. यामुळे भाग्याची साथ मिळणे कठीण होते.

६. शुक्र (Venus): सुख-समृद्धी आणि सौंदर्य

शुक्र हा ऐश्वर्याचा ग्रह आहे. स्त्रियांचा अनादर करणे आणि अस्वच्छ किंवा अस्ताव्यस्त राहणे यामुळे शुक्र खराब होतो. यामुळे घरातील लक्ष्मी दूर जाते आणि सुखात कमतरता येते.

७. शनि (Saturn): कर्माचा न्यायाधीश

शनी हा कर्माचा कारक आहे. मेहनत करण्यापासून पळ काढणे (आळस) आणि नोकर किंवा गरीब माणसांचा अपमान करणे यामुळे शनीची वक्रदृष्टी पडते. कष्ट केल्याशिवाय शनी कधीही प्रसन्न होत नाही.

८. राहू (Rahu): भ्रम आणि फसवणूक

राहू हा संभ्रमाचा कारक आहे. इतरांवर सतत संशय घेणे, मत्सर करणे, पाठीमागे निंदा करणे आणि फसवणूक (धोका) देणे यामुळे राहूचे नकारात्मक परिणाम वाढतात.

हे ही वाचा : Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!

९. केतू (Ketu): ओढ आणि विरक्ती

केतू हा मोक्षाचा ग्रह मानला जातो. स्वतःचे दुःख किंवा त्रास सर्वांना सांगत सुटणे आणि अति मोह (Attachement) बाळगणे यामुळे केतू खराब होतो. यामुळे जीवनात विनाकारण मानसिक क्लेश वाढतात.

थोडक्यात सांगायचे तर, आपली नैतिकता, नम्रता आणि स्वच्छता हेच खरे ग्रहांचे उपाय आहेत. ग्रहदशा सुधारायची असेल, तर बाहेर उपाय शोधण्यापेक्षा आधी स्वतःच्या सवयींमध्ये बदल करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Astro: Before blaming fate, know which habits anger planets!

Web Summary : Our habits influence planetary effects. Respect elders, avoid arrogance, control anger, and maintain cleanliness. Ethical behavior remedies negative planetary impacts, improving life.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष