शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 05:05 IST

Ashwin Sankashti Chaturthi October 2024: चातुर्मासातील शेवटची संकष्टी चतुर्थी असून, या व्रताचरणाचे महत्त्व आणि काही शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या...

Ashwin Sankashti Chaturthi October 2024: मराठी वर्षांत चातुर्मास काळाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. दिवाळीनंतर काहीच दिवसांनी म्हणजेच कार्तिक एकादशीला चातुर्मासाची सांगता होईल. तत्पूर्वी म्हणजे अश्विन महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. या संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण कसे करावे? शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया...

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. रविवार, २० ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे.

संकष्ट चतुर्थी व्रताची थोरवी

संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. 

दाशरथी करक संकष्ट चतुर्थी व्रत पूजा विधी

अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी दाशरथी चतुर्थी आणि करक चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. दाशरथी चतुर्थीला दशरथ राजाचे स्मरण करून व्रत केले जाते. तर उत्तर भारतात या दिवशी करवा चौथ व्रत करण्याची परंपरा आहे. करवा चौथ व्रताला अतिशय महत्त्व असून, ते मोठ्या प्रमाणावर केले जाते. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याचे त्याचे महत्त्वही वाढले आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
ठाणेरात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
सातारारात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
अहमदनगर (अहिल्यानगर)रात्रौ ०८ वाजून २७ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून २२ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून १९ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ०७ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ०९ मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून २५ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ०३ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून १० मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)रात्रौ ०८ वाजून २२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता १८ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून १८ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून १५ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ०१ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ०६ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून १७ मिनिटे
मालवणरात्रौ ०८ वाजून ३९ मिनिटे
पणजीरात्रौ ०८ वाजून ३९ मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून १३ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०७ वाजून ५४ मिनिटे

 

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीchaturmasचातुर्मासPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४spiritualअध्यात्मिकganpatiगणपती 2024