शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

शिवरात्री-शनिप्रदोष एकाच दिवशी: ‘असे’ करा शनी-महादेवांना प्रसन्न; होतील सर्व इच्छा संपूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:20 IST

Ashadhi Shivratri And Shani Pradosh 2023: शनिप्रदोष व शिवरात्री व्रत महादेवांची कृपा मिळावी आणि शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. कसे व्रताचरण करावे? मान्यता व महत्त्व जाणून घ्या...

Ashadhi Shivratri And Shani Pradosh 2023: मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मासाचा काळ सुरू आहे. काही दिवसांनी आषाढ महिन्याची सांगता होत आहे. यंदाच्या चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी श्रावण महिना अधिक असणार आहे. १८ जुलै २०२३ पासून अधिक श्रावण सुरू होत आहे. मात्र, तत्पूर्वी आषाढ महिन्यात एक शुभ योग जुळून येत आहे. १५ जुलै २०२३ रोजी शिवरात्री आणि शनिप्रदोष एकाच दिवशी आले आहेत. काही मान्यतांनुसार, शनी देव महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे शनिप्रदोषच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे. व्रताचरणाची सोपी पद्धत, महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया... (Significance of Shivratri And Shani Pradosh Vrat)

आषाढ शिवरात्रीला शुभ संयोग जुळून येत आहेत. या दिवशी केलेले व्रतपूजन शुभ-फलदायी ठरू शकते. मनापासून शिवरात्रीचे व्रत करणाऱ्या भाविकांच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. आषाढ वद्य त्रयोदशी तिथी १४ जुलै रोजी सायंकाळी ०७ वाजून १८ मिनिटांनी सुरू होत आहे. १५ जुलै रोजी ०८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल. शिवरात्रीला अभिषेक करायचा असेल तर निशिथकाळी करणे शुभ मानले गेले आहे. १५ जुलै रोजी शिवरात्रीचे व्रताचरण केले जाणार आहे. हा दिवस अतिशय शुभ वृद्धी योग जुळून येत आहे. त्यामुळे ही शिवरात्री अत्यंत शुभ मानली गेली आहे. 

शिवरात्रीचे व्रताचरण, पूजाविधी

शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन अभिषेक करणे शुभ मानले गेले आहे. मात्र, घरातील शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, भांग आणि नारळही अर्पण करू शकता. यानंतर भगवान शंकराचा रुद्राभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. 

शनिप्रदोष आणि शिवपूजनाचे महत्त्व

प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. शनिप्रदोष व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्या व्यक्तींनी आवर्जून हे व्रत करावे, असा सल्लाही दिला जातो. 

शनिप्रदोष व्रताचरणाची सोपी पद्धत

प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. यानंतर शनिदेवाची पूजा करावी आणि शनि चालिसाचे पठण करावे. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते आणि भगवान शंकराची कृपा देखील प्राप्त होते, असे म्हटले जाते. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनी देवांचे दर्शन घेणे चांगले मानले जाते.

साडेसाती आणि शनिप्रदोष व्रताचे महत्त्व

शनिप्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर १०८ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. शनिवारी हे करणे शुभ मानले जाते. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. असे केल्याने तुमच्यावर ग्रहांचा अनुकूल प्रभाव पडतो आणि शनिदेवही प्रसन्न होतात, असे सांगितले जाते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मूळाशी पाणी आणि दूध अर्पण करावे. शक्य असल्यास पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यानंतर पितरांचे स्मरण करून पिंपळाची पूजा करावी. पूजा केल्यानंतर झाडाखाली हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. पिंपळाला प्रदक्षिणा घालावी. आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. ज्या लोकांची शनीदशा, अंतर्दशा आणि महादशा आहे, त्यांनीही शनि प्रदोष व्रत करावे, असा सल्ला दिला जातो.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिक