शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:11 IST

Pandharpur Ashadhi Wari 2025 Special Trains: आषाढी वारीसाठी रेल्वेकडून पंढरपूरसाठी ८० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

Ashadhi Ekadashi 2025: वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा झाली की, सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात. संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात. लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिद्धी आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी येतात. उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून ८० विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी ८० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेची ही सेवा असणार आहे. पुणे, नागपूर, अमरावती, कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून या ट्रेनची सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वारीसाठी, आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची सोय होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

कोणत्या मार्गांवर चालवल्या जाणार विशेष सेवा?

पुणे-मिरज, नागपूर-मिरज, न्यू अमरावती-पंढरपूर विशेष, खामगाव-पंढरपूर विशेष, लातूर-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष, मिरज-कलबुर्गी, कोल्हापूर-कुर्डूवाडी अशा ८० पेक्षा अधिक आषाढी विशेष फेऱ्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज असल्याचे रेल्वे प्रशासनाने असल्याचे म्हटले जात आहे. या ट्रेनचे आरक्षण सुरू झाले आहे. तसेच राज्य सरकारने पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला असून त्याचा शासन आदेशही निघाला आहे.

दरम्यान, १८ जून २०२५ रोजी जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून १९ जून २०२५ रोजी प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच अन्य मानाच्या पालख्यांचे प्रस्थानही होत आहे.

 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी