शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2024: ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी आषाढीला 'अशी' करा सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 07:00 IST

Ashadhi Ekadashi 2024: एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठप्राप्ती होते आणि महापुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यासाठी ही सविस्तर माहिती.

१७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते, त्यांनी आषाढी पासून या व्रताची सुरुवात करायला हवी. त्याबद्दल अधिक वाचा. 

एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे. या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इ. गोष्टी व्यर्ज्य कराव्यात. यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. म्हणून एकादशीचा उपास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो. 

एकादशीचा संकल्प:

या दिवशी `मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षय पूर्वक श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्रीपरमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमहं करिष्ये' असा संकल्प उच्चारून ताम्हनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे. एकादशीस होम हवन करण्याची पद्धत नाही.

एकादशी व्रताची समाप्ती: 

कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते. मात्र हे व्रत ऐंशीव्या वर्षांपर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली, तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. 

एकादशीची नावे :

प्रत्येक मासात दोनदा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला २४ एकादशी येतात. पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपास करतो. परंतु, दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली असतात. जसे की आज आमलकी एकादशी आहे. आजची एकादशी आवळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले, तर आपल्याला तिथी, वार, नक्षत्र यांची माहिती राहते. तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा, व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो. 

ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी पुढील नियम पाळावेत असे श्रेयस कुलकर्णी लिहितात. 

आषाढी एकादशी जवळच आहे. ज्यांना एकादशी चे व्रत घ्यायचे आहे त्यांना सुरू करण्याचा हा दिवस उत्तम मानला गेला आहे. 

१. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारिरीक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही.२. एकादशी करणाराला संकटातसुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते. ३. एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव दैवतेशी जोडले जाणे.४. एकादशी करणाराचे पूर्वकर्म शुद्ध होते.५. एकादशी करणाराची एकाग्रता वाढते. ६. एकादशी करणाराला अन्नाची खा खा होत नाही, परिणामतः झोप सुद्धा परिसिमित राहते, विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते. 

एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात. त्याने ती बारा वर्षे प्रतिवर्ष चोवीस एकादशी केल्या होत्या. एकादशी व्रत हे राजा अंबरीष, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी केले आहे. आपण करून आपला उत्कर्ष साधूया. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३