शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2022: चतुर्मासात श्रीविष्णूंची योगनिद्रा ११८ दिवस तर लग्नकार्याची स्थगिती १३२ दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:24 IST

Ashadhi Ekadashi 2022: चार महिने शुभ कार्याला स्थगिती का? जाणून घ्या कारण आणि पुढील विवाह मुहूर्त!

आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असे म्हणतो व कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतो. याचाच अर्थ चार महिने देव झोपतात असे आपण म्हणतो. यंदा १० जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. देवाच्या झोपेचे चार महिने आपण मंगलकार्य वगळता सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करतो. तो काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिक मासात देव उठले की नंतर मंगलकार्याला सुरुवात होते. त्यामुळे लग्नकार्याची सुरूवात थेट २१ नोव्हेंबर नंतर होईल.  तसे का? हे जाणून घेऊ!

आपल्या सनातन धर्माने अत्यंत विचारपूर्वक देश-काल-स्थिती सांभाळून या गोष्टींची आखणी केली आहे व त्याचा संबंध धर्म तसेच ईश्वराशी जोडला आहे. धर्म व्यवस्था ही आपल्या सुरक्षिततेसाठी, विकासासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली रचना असते. त्यानुसार नियमांचे पालन करून आपले आयुष्य सुकर व्हावे, एवढाच त्यामागील हेतू असतो. 

एखादी गोष्ट सहज सांगितली तर त्याकडे दुर्लक्ष करणे, हा मनुष्यस्वभाव असतो. परंतु त्याला धाकदपटशा लगेच कळतो. शिक्षा होईल या भितीने नियमांचे पालन करतो. हा मनुष्यस्वभाव ओळखून सनातन धर्माने प्रत्येक गोष्टीची सांगड देव-धर्माशी लावून दिली आहे. समाजाने नियमांचे पालन करावे यासाठी 'धाक', `लोभ' नाहीतर `प्रेम' यापैकी एक मार्ग अनुसरावा लागतो. सद्यस्थितीत देवाबद्दल प्रेम पहायला मिळणे दुर्लभ झाले आहे. मग मार्ग राहतो धाकाचा नाहीतर लोभाचा! म्हणून तोच मार्ग अनुसरून `देवशयनी एकादशी'चे आयोजन धर्मशास्त्राने केले आहे. 

आषाढात पावसाचे आगमन होते. पृथ्वी हरीत होते. सृजनतेचा सोहळा रंगतो. धान्य रुजते. पिक फोफावते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते त्यामुळे या चार महिन्यात मनुष्याला आपली उणीव भासणार नाही, अशी देवानेच व्यवस्था लावून दिलेली असते. अशी व्यवस्था लावून देत पुढील चार महिने सृष्टीचा कारभार तू आपल्या हाती घे आणि नवनिर्मितीचा आनंद घे असे म्हणत परमेश्वर मनुष्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकतो. काही अडीअडचण आली तर तो आहेच, परंतु त्याच्या अनुपस्थितीत आपण प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडू शकू हा त्याला विश्वासही आहे. तो विश्वास सार्थ ठरवून भक्ताने चातुर्मासात देवाला स्मरून प्रत्येक कार्य करावे आणि देवाला समर्पित करावे. 

अशा काळात मनुष्य जर मंगल कार्यात अडकून राहिला, तर जबाबदारी पूर्ण करणार कधी? तसेच या काळात निसरडे रस्ते, धुसर वातावरण, वादळी वारा यात अपघात होऊ नये आणि मंगलकार्यात विरजण पडू नये, म्हणूनही मंगलकार्य टाळले आहे. 

ही दूरदृष्टी पाहिल्यावर आपल्याला आपल्या पूर्वजांचा, संस्कृतीचा आणि धर्माचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. देवशयनी एकादशीच्या निमित्ताने आपण आपली जबाबदारी ओळखून परमेश्वर आणि परिस्थितीवर अवलंबून न राहता कर्मावर भर दिला पाहिजे, हाच या उत्सवाचा हेतू आहे. 

त्यादृष्टीने या चार महिन्यात देवभक्ती करावी आणि शुभकार्याची तयारी करून देवाच्या साक्षीने २१ नोव्हेम्बर ते १४ डिसेम्बर या कालावधीत शुभ कार्य करावे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी