शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
2
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
3
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
4
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
5
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
6
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
7
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
8
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
9
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
10
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
11
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
12
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
13
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
14
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
15
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
16
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
17
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
18
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
19
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
20
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीपासून पुढचे चार महिने देव खरोखरच झोपतात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 12:50 IST

Ashadhi Ekadashi 2021: देवाचे झोपणे किंवा भक्ताने त्याला विश्रांती घे सांगणे हे प्रतीकात्मक आहे. देव कायम जागृत असतो, झोप आपल्याला लागलेली असते. त्याच झोपेतून जागे होण्यासाठी चतुर्मास ही भक्तांसाठी पर्वणी!

आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असे म्हणतो व कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतो. याचाच अर्थ चार महिने देव झोपतात असे आपण म्हणतो. यंदा २० जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. देवाच्या झोपेचे चार महिने आपण मंगलकार्य वगळता सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करतो. तो काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिक मासात देव उठले की नंतर मंगलकार्याला सुरुवात होते.

आपल्या सनातन धर्माने अत्यंत विचारपूर्वक देश-काल-स्थिती सांभाळून या गोष्टींची आखणी केली आहे व त्याचा संबंध धर्म तसेच ईश्वराशी जोडला आहे. धर्म व्यवस्था ही आपल्या सुरक्षिततेसाठी, विकासासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली रचना असते. त्यानुसार नियमांचे पालन करून आपले आयुष्य सुकर व्हावे, एवढाच त्यामागील हेतू असतो. 

एखादी गोष्ट सहज सांगितली तर त्याकडे दुर्लक्ष करणे, हा मनुष्यस्वभाव असतो. परंतु त्याला धाकदपटशा लगेच कळतो. शिक्षा होईल या भितीने नियमांचे पालन करतो. हा मनुष्यस्वभाव ओळखून सनातन धर्माने प्रत्येक गोष्टीची सांगड देव-धर्माशी लावून दिली आहे. समाजाने नियमांचे पालन करावे यासाठी 'धाक', `लोभ' नाहीतर `प्रेम' यापैकी एक मार्ग अनुसरावा लागतो. सद्यस्थितीत देवाबद्दल प्रेम पहायला मिळणे दुर्लभ झाले आहे. मग मार्ग राहतो धाकाचा नाहीतर लोभाचा! म्हणून तोच मार्ग अनुसरून `देवशयनी एकादशी'चे आयोजन धर्मशास्त्राने केले आहे. 

आषाढात पावसाचे आगमन होते. पृथ्वी हरीत होते. सृजनतेचा सोहळा रंगतो. धान्य रुजते. पिक फोफावते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते त्यामुळे या चार महिन्यात मनुष्याला आपली उणीव भासणार नाही, अशी देवानेच व्यवस्था लावून दिलेली असते. अशी व्यवस्था लावून देत पुढील चार महिने सृष्टीचा कारभार तू आपल्या हाती घे आणि नवनिर्मितीचा आनंद घे असे म्हणत परमेश्वर मनुष्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकतो. काही अडीअडचण आली तर तो आहेच, परंतु त्याच्या अनुपस्थितीत आपण प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडू शकू हा त्याला विश्वासही आहे. तो विश्वास सार्थ ठरवून भक्ताने चातुर्मासात देवाला स्मरून प्रत्येक कार्य करावे आणि देवाला समर्पित करावे. 

अशा काळात मनुष्य जर मंगल कार्यात अडकून राहिला, तर जबाबदारी पूर्ण करणार कधी? तसेच या काळात निसरडे रस्ते, धुसर वातावरण, वादळी वारा यात अपघात होऊ नये आणि मंगलकार्यात विरझण पडू नये, म्हणूनही मंगलकार्य टाळले आहे. 

ही दूरदृष्टी पाहिल्यावर आपल्याला आपल्या पूर्वजांचा, संस्कृतीचा आणि धर्माचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. देवशयनी एकादशीच्या निमित्ताने आपण आपली जबाबदारी ओळखून परमेश्वर आणि परिस्थितीवर अवलंबून न राहता कर्मावर भर दिला पाहिजे, हाच या उत्सवाचा हेतू आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी