शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Ashadha Amavasya 2024: आषाढ अमावस्येला दीप पूजन झाल्यावर लहान मुलांना औक्षण का करतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:35 IST

Deep Amavasya 2024: यंदा रविवारी ४ ऑगस्ट रोजी दीप अमावस्या आहे. यादिवशी दिव्यांच्या पूजेबरोबरच लहान मुलांना औक्षण का करायचे ते जाणून घेऊ. 

आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे आहे. अगदी अमावस्येचे महत्त्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे. जसे की आषाढ अमावस्या (Ashadha Amavasya 2024) . हा दिवस दिव्याची आवस (Deep Amavasya 2024) अशा नावानेही ओळखला जातो. या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते. का, कशासाठी ते पाहू...

भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला `प्राणज्योत' म्हणतात. घरातील मुलांना `वंशाचे दिवे' म्हणातात, इतका हा दीप मानवाशी निगडित झालेला आहे. 

दीप म्हणजे काय, तर प्रकाश! जेथे प्रकाश असतो, तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय? तर संकट आणि दीप म्हणजे काय, तर तेज! जिथे तेज असते, तिथे संकटही घाबरून पळते. असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी, यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दीव्याने ओवाळले जाते. आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत, यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कारविधी आहे. या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापडतो.

या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापडतो. यमुनेच्या तीरावर दररोज गाई गुरे मृत्यूमुखी पडत होती. तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले. त्याने यमुनेत उडी टाकून कालियामर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन, त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दीव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने व त्या दीवशी दीव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची  आवस अशी ओळख मिळाली. यासाठीच श्रावणात जिवती पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते.

चला, तर आपणही आपल्या घरातील लेकरांना, तसेच त्यांच्या मित्रपरिवाराला दीव्यांनी ओवाळून त्यांना दीव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूया.

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Shravan Specialश्रावण स्पेशल